संवादिनीवादक वामन वागुकर यांचे निधन

प्रतिनिधी/ बेळगाव पवार गल्ली, शहापूर येथील रहिवासी व लोकप्रिय संवादिनीवादक वामन वागुकर (वय 63) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. वामन वागुकर गेल्या चाळीस वर्षांपासून संगीतक्षेत्रात संवादिनीवादक म्हणून परिचित होते. पं. रामभाऊ विजापुरे व पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्याकडे त्यांनी संवादिनी वादनाचे व संगीताचे […]

संवादिनीवादक वामन वागुकर यांचे निधन

प्रतिनिधी/ बेळगाव
पवार गल्ली, शहापूर येथील रहिवासी व लोकप्रिय संवादिनीवादक वामन वागुकर (वय 63) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
वामन वागुकर गेल्या चाळीस वर्षांपासून संगीतक्षेत्रात संवादिनीवादक म्हणून परिचित होते. पं. रामभाऊ विजापुरे व पं. बी. व्ही. कडलास्कर बुवा यांच्याकडे त्यांनी संवादिनी वादनाचे व संगीताचे शिक्षण घेतले. मात्र, त्यापुढील सर्व प्रवास त्यांनी स्वत:च्या प्रयत्नांतून विकसित केला. पं. राजप्रभू धोत्रे यांच्यासह बेळगाव आणि बाहेरील अनेक गायकांना त्यांनी संवादिनीची साथ दिली होती. कीर्तनकार, ख्यालगायक, वचनगायक, जानपद अशा संगीत प्रकारांची त्यांना आवड होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने बेळगावकरांनी व प्रामुख्याने संगीत क्षेत्रातील रसिकांनी व गायकांनी हळहळ व्यक्त केली.