महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात

सोलापूर-पुणे रस्त्यावर गुरुवारी सकाळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारची खासगी बसला धडक बसली. सुदैवाने या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीची कार गुरुवारी सकाळी …

महाराष्ट्रात धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या गाडीला अपघात

सोलापूर-पुणे रस्त्यावर गुरुवारी सकाळी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारची खासगी बसला धडक बसली. सुदैवाने या अपघातातून त्या थोडक्यात बचावल्या आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीची कार गुरुवारी सकाळी सोलापूर-पुणे रस्त्यावर एका खासगी बसला धडकली. पण सुदैवाने त्या थोडक्यात बचावल्या आहे.

 

या घटनेबाबत उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या अधिकारींनी सांगितले की, सोलापूर-पुणे महामार्गावरील सोरतापवाडीजवळ आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. खासगी बसचा वेग कमी होताच कार पाठीमागून आदळली, त्यामुळे किरकोळ अपघात झाला. या अपघातात राजश्री मुंडे सुखरूप बचावल्या आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याकडे राज्याच्या कृषी खात्याचा कार्यभार आहे.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source