बीड येथील सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य

Dhananjay Munde News: बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले असून मंत्री धनंजय मुंडे आरोपींना संरक्षण देत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहे. आता या सर्व आरोपांवर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली …

बीड येथील सरपंच हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य

Dhananjay Munde News: बीडमधील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले असून मंत्री धनंजय मुंडे आरोपींना संरक्षण देत असल्याच्या बातम्या आता समोर येत आहे. आता या सर्व आरोपांवर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी बोललो तर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला अडचण येईल, अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.  

ALSO READ: घराला भीषण लागल्याने एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री धनंजय मुंडे सध्या नागपुरात आहे. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले. धनंजय मुंडे म्हणाले की, ‘विरोधक काही बोलतील. व मी याबद्दल बोलेन. ज्याचे उत्तर देणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कठीण जाईल. काहीही झाले तरी दूध का दूध आणि पानी का पानी होईल.  

 

बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली. या प्रकरणाशी स्वत:ला जोडल्याच्या आरोपाबाबत मुंडे यांना विचारले असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या तपासात आज सत्य बाहेर येईल, असे मुंडे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की,  मी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करतो. या प्रकरणाचा तपास सुरू असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.’ असे मुंडे म्हणाले.

Edited By- Dhanashri Naik 

Go to Source