राज्यात ठिकठिकाणी धालोत्सवाची सांगता

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुऊ असलेल्या धालोत्सवाची ठिकठिकाणी  सांगता झाली. ‘आम्ही पिंगळी घाटाचे तांदुळ दियात आमका घाटा’चे असे म्हणत पिंगळीनी आपला मान घेतला. उत्सवांची परंपरा असलेल्या राज्यात विविध प्रकारचे अनेक उत्सव साजरे केले जातात. काही उत्सव सरकारी पातळीवर होतात तर काही उत्सव समाज किंवा गाव पातळीवर होत असतात. त्यातीलच एक धोलोत्सव हा राज्यात […]

राज्यात ठिकठिकाणी धालोत्सवाची सांगता

पणजी : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुऊ असलेल्या धालोत्सवाची ठिकठिकाणी  सांगता झाली. ‘आम्ही पिंगळी घाटाचे तांदुळ दियात आमका घाटा’चे असे म्हणत पिंगळीनी आपला मान घेतला. उत्सवांची परंपरा असलेल्या राज्यात विविध प्रकारचे अनेक उत्सव साजरे केले जातात. काही उत्सव सरकारी पातळीवर होतात तर काही उत्सव समाज किंवा गाव पातळीवर होत असतात. त्यातीलच एक धोलोत्सव हा राज्यात मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मराठी महिन्यानुसार पौष महिन्यात (सून महिना) धालोत्सव शहरात तसेच ग्रमीण भागात साजरा केला जातो. विशेषत: महिलांसाठी हा उत्सव असतो. त्यामुळे गेले काही दिवस महिलांनी धालोत्सवात मनमुराद आनंद लुटला. काही गावात सात दिवस तर काही गावात पाच दिवस धालोत्सव साजरा करण्यात आला. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसांपर्यंत दर दिवशी रात्री खास महिला आणि मुलांसाठी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते तर काही ठिकाणी नाटकेही सादर करण्यात आली. शेवटच्या दिवशी संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम, नंतर नवरदेवाची मिरवणूक काढून लग्न समारंभ, नंतर सावज मारणे आणि पहाटे पासून पिंगळीनी घराघरात जाऊन आपला मान घेतला. अखेर माण शिंपून धालोत्सवची सांगता झाली.