जोतिबा यात्रेसाठी भाविक बैलगाड्यांसह रवाना
बेळगाव : नार्वेकर गल्ली येथील ज्योतीर्लिंग देवस्थानमधील जोतिबाची मूर्ती व बैलगाड्या कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर रविवारी रवाना झाल्या. जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या दवण्याकरिता बैलगाड्या वाजत-गाजत रवाना झाल्या. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे जोतिबाची यात्रा भरणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावमधून पारंपरिक पद्धतीने बैलगाड्या रवाना झाल्या. बैलगाड्यांना आकर्षक पद्धतीने सजावट करण्यात आली होती. 150 हून अधिक भाविक व 16 हून अधिक बैलगाड्या घेऊन जोतिबाचे भाविक डोंगराकडे रवाना झाले. 28 एप्रिलला भाविक पुन्हा बेळगावला परतणार आहेत. त्यादिवशी कोल्हापूर सर्कल येथे आंबिल घुगऱ्यांची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग मंदिरात पोहोचणार आहे.
Home महत्वाची बातमी जोतिबा यात्रेसाठी भाविक बैलगाड्यांसह रवाना
जोतिबा यात्रेसाठी भाविक बैलगाड्यांसह रवाना
बेळगाव : नार्वेकर गल्ली येथील ज्योतीर्लिंग देवस्थानमधील जोतिबाची मूर्ती व बैलगाड्या कोल्हापूर येथील वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर रविवारी रवाना झाल्या. जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेला होणाऱ्या दवण्याकरिता बैलगाड्या वाजत-गाजत रवाना झाल्या. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मंगळवार दि. 23 एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथे जोतिबाची यात्रा भरणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी बेळगावमधून पारंपरिक पद्धतीने बैलगाड्या […]