सांबरा येथील भाविक सवाद्य मिरवणुकीने यल्लम्मा डोंगराकडे रवाना

वार्ताहर /सांबरा सांबरा येथील भाविक सोमवारी भंडाऱ्याची उधळण करत व यल्लम्मा देवीच्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले. यंदा मे महिन्यामध्ये गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण गाव फरशी घेऊन सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी डोंगराकडे सोमवारी रवाना झाले. सकाळी नऊ वाजता श्री दुर्गादेवी मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीने ग्रामस्थ मार्गस्थ […]

सांबरा येथील भाविक सवाद्य मिरवणुकीने यल्लम्मा डोंगराकडे रवाना

वार्ताहर /सांबरा
सांबरा येथील भाविक सोमवारी भंडाऱ्याची उधळण करत व यल्लम्मा देवीच्या जयघोषात सवाद्य मिरवणुकीने सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले. यंदा मे महिन्यामध्ये गावची श्री महालक्ष्मी देवीची यात्रा होणार आहे. त्यानिमित्त संपूर्ण गाव फरशी घेऊन सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी डोंगराकडे सोमवारी रवाना झाले. सकाळी नऊ वाजता श्री दुर्गादेवी मंदिर येथून सवाद्य मिरवणुकीने ग्रामस्थ मार्गस्थ झाले. यावेळी भंडाऱ्याची एकच उधळण करत व यल्लम्मा देवीचा जयजयकार करत मिरवणूक निघाली. सर्व ग्रामस्थ बाळेकुंद्री खुर्दपर्यंत पायी चालत मिरवणुकीने मार्गस्थ झाले. त्यानंतर बाळेकुंद्री खुर्द येथून ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रॅक्स यासह मिळेल त्या चारचाकी वाहनांतून सर्व ग्रामस्थ डोंगराकडे निघाले. दुपारी जोगनभावी येथे पोहोचल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पडली भरण्याचा कार्यक्रम झाला.
आज पडली भरण्याचा कार्यक्रम
मंगळवार 30 रोजी डोंगरावर ग्रामस्थातर्फे पडली भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. यल्लम्मादेवी यात्रेसाठी सर्व ग्रामस्थ डोंगरावर उपस्थित आहेत. त्यामुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.