मुंबईत मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त केला पाहीजे…देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्ला
काल ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेमध्ये विधानसभा सभापती राहूल नार्वेकर आणि शिंदे सरकारवर जोरदार आरोप करताना सुप्रिम कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला. तसेच राहूल नार्वेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगून त्यांनी जाहीर आवाहनही त्यांनी केले. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत…त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण गरजेचं असल्याचं म्हणून ठाकरे गटाला एकप्रकारे इशाराचं दिला आहे.
आमदार अपात्रतेच्या निर्णयावर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांनी आपला निर्णय जाहीर केला. या निकालात शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना पात्र ठरवण्यात येऊन एकनाथ शिंदे यांची निवड योग्य असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने जाहीर महापत्रकार परिषद घेऊन सभापती राहूल नार्वेकर यांनी निशाण्यावर धरलं आहे. तसेच तसेच मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला केला. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख शुर्पणखा असा केला.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौऱ्यावर आहेत. कराड येथील जाहीर कृषी प्रदर्षनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी जाहीर सभेत त्यांनी ठाकरे गटावर निषाणा साधला. ते म्हणाले, “कराडच्या कृषी प्रदर्शनात ४२ लाखांचा बैल आला आहे…इलेक्ट्रॉनिक बैलही आलेला आहे…सर्वात छोटी गायही आलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला या कृषी प्रदर्शनात अनेक गोष्टी पाहण्यास मिळत आहेत….फक्त माझी तुम्हाला एकच विनंती आहे आमच्या मुंबईतही काही रेडे मोकाट सुटलेत…त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल मला कळवा. ते रेडे इतके टीव्हीवर बोलतात की त्यावर उपायाचं काही तंत्रज्ञान असेल तर ते आम्हाला सांगा” असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
Home महत्वाची बातमी मुंबईत मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त केला पाहीजे…देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्ला
मुंबईत मोकाट सुटलेल्या रेड्यांचा बंदोबस्त केला पाहीजे…देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्ला
काल ठाकरे गटाने महापत्रकार परिषदेमध्ये विधानसभा सभापती राहूल नार्वेकर आणि शिंदे सरकारवर जोरदार आरोप करताना सुप्रिम कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप केला. तसेच राहूल नार्वेकरांच्या विरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याचे सांगून त्यांनी जाहीर आवाहनही त्यांनी केले. कालच्या पत्रकार परिषदेनंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देताना मुंबईमध्ये काही रेडे मोकाट सुटले आहेत…त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण गरजेचं असल्याचं […]