शेतकरी-गरिबांचा विकास केवळ काँग्रेसकडूनच
प्रियांका जारकीहोळी : बेल्लद बागेवाडी येथे प्रचार
बेळगाव : काँग्रेस पक्षाने नेहमीच गरिबांची साथ दिली आहे. सर्व जाती-धर्माच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या काँग्रेस पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदार संघातील हुक्केरी मतदारसंघातील बेल्लदबागेवाडी जि. पं. व्याप्तीमध्ये निवडणुकीचा प्रचार करून त्या बोलत होत्या. काँग्रेस पक्षाकडून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन भेदभाव न ठेवता विकास केला आहे. यासाठी मतदारांनी बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन प्रियांका जारकीहोळी यांनी केले. राज्य सरकारकडून महिला सबलीकरणाला प्राधान्य दिले आहे. राज्यात भाजपचे 25 खासदार असतानाही दुष्काळी मदतनिधीसाठी लोकसभेत आवाज उठविलेला नाही. शेतकऱ्यांच्या समस्या सरकारसमोर मांडण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे काँग्रेसला साथ देऊन केंद्रात सत्तेत आणण्यास भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी हुक्केरी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष विजय रवदी, रवी कराळे, रेखा चिकोडी, हणमंत नायक, लक्ष्मण नुली, राजशेखर मेनशीनकाई, कल्लाप्पा पाटील, गोपाळ कांबळे, सीता मठपती, रेखा पाटील आदी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी शेतकरी-गरिबांचा विकास केवळ काँग्रेसकडूनच
शेतकरी-गरिबांचा विकास केवळ काँग्रेसकडूनच
प्रियांका जारकीहोळी : बेल्लद बागेवाडी येथे प्रचार बेळगाव : काँग्रेस पक्षाने नेहमीच गरिबांची साथ दिली आहे. सर्व जाती-धर्माच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. विकासाला प्रोत्साहन देणाऱ्या काँग्रेस पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन चिकोडी लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी केले. चिकोडी लोकसभा मतदार संघातील हुक्केरी मतदारसंघातील बेल्लदबागेवाडी जि. पं. व्याप्तीमध्ये निवडणुकीचा प्रचार करून त्या बोलत होत्या. […]