बुद्धांनी दिलेल्या वचनांवर वाटचाल केल्यास विकास
बुद्ध जयंती उत्साहात साजरी
बेळगाव : बुद्ध जयंतीनिमित्त शहरातून चित्ररथ देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कित्तूर चन्नम्मामार्गे सदाशिवनगर येथील बुद्ध विहार येथे मिरवणूक पोहोचली. बुद्ध विहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दीपक मेत्री यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर राजेंद्र कांबळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले एस. आर. कोकटे यांनी बुद्धांच्या जीवन चरित्राची माहिती दिली. त्यानंतर प्रा. के. डी. मंत्रेशी यांनी बुद्धांच्या कार्याचा आढावा घेतला. बौद्ध धर्म स्थापन करण्यामागे तळागाळातील जनतेला योग्य न्याय मिळावा हा होता. त्यामुळेच समाजाचा विकास झाल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष यमनाप्पा गडीनाईक हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी संपूर्ण समाजाने बुद्धांनी दिलेल्या तत्वांवर चालावे, असे आवाहन त्यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र कांबळे, रमेश शिरोटे, यशवंत कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. बुद्ध वंदना झाल्यानंतर भाषण स्पर्धा पार पडल्या.
Home महत्वाची बातमी बुद्धांनी दिलेल्या वचनांवर वाटचाल केल्यास विकास
बुद्धांनी दिलेल्या वचनांवर वाटचाल केल्यास विकास
बुद्ध जयंती उत्साहात साजरी बेळगाव : बुद्ध जयंतीनिमित्त शहरातून चित्ररथ देखाव्यांसह मिरवणूक काढण्यात आली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर कित्तूर चन्नम्मामार्गे सदाशिवनगर येथील बुद्ध विहार येथे मिरवणूक पोहोचली. बुद्ध विहार येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दीपक मेत्री यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर राजेंद्र […]