विलेपार्ले मतदारसंघात विकासाचा अभाव

विलेपार्ले (vile parle) मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच (elections) तिरंगी लढत सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (bjp), काँग्रेस (congress) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) यांच्या लढतीत येथील मैदान रंगले होते. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला असलेला एअर फनेल झोन हा मतदारसंघावर परिणाम करणारा कळीचा मुद्दा म्हणून ओळखला जातो. या भागात विमानतळाच्या दुहेरी धावपट्टीमुळे आणखीन वाढलेले निर्बंध यामुळे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारंवार आश्वासनं देऊन कोणतीही महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली नाहीत. ज्यामुळे रहिवासी आणि विकासक निराश झाले आहेत. एअर फनेल निर्बंध आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाच्या चिंतेव्यतिरिक्त, मतदारसंघात इतर अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणे, किरकोळ गुन्ह्यांमध्ये वाढ, सुसज्ज सार्वजनिक रुग्णालयांचा अभाव आणि मोकळ्या सामुदायिक जागांची अपुरी देखभाल या समस्यांबाबत वारंवार तक्रार केली जात आहे. मरोळमधील मोकळ्या भूखंडांवर अनधिकृतपणे पाण्याचे टँकर चालवणे आणि बेकायदेशीर गॅरेज सुरू असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. स्थानिक समित्यांनीही बेकायदेशीर पार्किंगच्या सततच्या समस्येची बाब समोर आणली आहे. मात्र या समस्यांकडे अधिकारी वारंवार दुर्लक्ष करत आहेत. विलेपार्ले येथील मतदारांची संख्या सुमारे 275,325 आहे. येथली नागरिकांचे राहणीमान सततच्या भेडसावणाऱ्या समस्यांमुळे प्रभावित झाले आहे. या मतदारसंघात जवळपास निम्मे शास्त्री नगर, आग्रीपाडा, अशोक नगर, बामनवाडा, सहार गाव आणि चिमटपाडा येथील अनेक मतदार हे झोपडपट्टी भागात राहतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत (elections) येथील नागरिक कोणाला निवडून देणार. तसेच या निकालाच्या निर्णयातून त्यांच्या समस्या दूर होणार की नाही हे येत्या काळात कळेलच.हेही वाचा पनवेलमध्ये शिवसेनेत फूट RMC प्लांट बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल

विलेपार्ले मतदारसंघात विकासाचा अभाव

विलेपार्ले (vile parle) मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच (elections) तिरंगी लढत सुरू आहे. 2019 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (bjp), काँग्रेस (congress) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) यांच्या लढतीत येथील मैदान रंगले होते.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूला असलेला एअर फनेल झोन हा मतदारसंघावर परिणाम करणारा कळीचा मुद्दा म्हणून ओळखला जातो. या भागात विमानतळाच्या दुहेरी धावपट्टीमुळे आणखीन वाढलेले निर्बंध यामुळे पुनर्विकास प्रकल्प रखडले आहेत. या समस्येचे निराकरण करण्यासाठी वारंवार आश्वासनं देऊन कोणतीही महत्त्वपूर्ण पावले उचलली गेली नाहीत. ज्यामुळे रहिवासी आणि विकासक निराश झाले आहेत. एअर फनेल निर्बंध आणि झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाच्या चिंतेव्यतिरिक्त, मतदारसंघात इतर अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणे, किरकोळ गुन्ह्यांमध्ये वाढ, सुसज्ज सार्वजनिक रुग्णालयांचा अभाव आणि मोकळ्या सामुदायिक जागांची अपुरी देखभाल या समस्यांबाबत वारंवार तक्रार केली जात आहे. मरोळमधील मोकळ्या भूखंडांवर अनधिकृतपणे पाण्याचे टँकर चालवणे आणि बेकायदेशीर गॅरेज सुरू असल्याच्या तक्रारी रहिवाशांनी केल्या आहेत. स्थानिक समित्यांनीही बेकायदेशीर पार्किंगच्या सततच्या समस्येची बाब समोर आणली आहे. मात्र या समस्यांकडे अधिकारी वारंवार दुर्लक्ष करत आहेत. विलेपार्ले येथील मतदारांची संख्या सुमारे 275,325 आहे. येथली नागरिकांचे राहणीमान सततच्या भेडसावणाऱ्या समस्यांमुळे प्रभावित झाले आहे. या मतदारसंघात जवळपास निम्मे शास्त्री नगर, आग्रीपाडा, अशोक नगर, बामनवाडा, सहार गाव आणि चिमटपाडा येथील अनेक मतदार हे झोपडपट्टी भागात राहतात. त्यामुळे येत्या निवडणुकीत (elections) येथील नागरिक कोणाला निवडून देणार. तसेच या निकालाच्या निर्णयातून त्यांच्या समस्या दूर होणार की नाही हे येत्या काळात कळेलच.हेही वाचापनवेलमध्ये शिवसेनेत फूटRMC प्लांट बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल

Go to Source