पुणे-बेंगळूर रेल्वे कॉरिडॉरचा विकास करा

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी : हुबळी-बेळगाव रेल्वे प्रश्नांविषयी चर्चा  बेळगाव : पुणे-बेंगळूर या दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करावा अशी मागणी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या कॉरिडॉरमुळे बेळगावसह, हुबळी, हावेरी, चित्रदुर्ग व तुमकूर या शहरांचाही विकास होणार असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. बुधवारी प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हुबळी-बेळगाव या परिसरातील रेल्वे प्रश्नांविषयी चर्चा […]

पुणे-बेंगळूर रेल्वे कॉरिडॉरचा विकास करा

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी : हुबळी-बेळगाव रेल्वे प्रश्नांविषयी चर्चा 
बेळगाव : पुणे-बेंगळूर या दरम्यान हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर तयार करावा अशी मागणी केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. या कॉरिडॉरमुळे बेळगावसह, हुबळी, हावेरी, चित्रदुर्ग व तुमकूर या शहरांचाही विकास होणार असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे. बुधवारी प्रल्हाद जोशी यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन हुबळी-बेळगाव या परिसरातील रेल्वे प्रश्नांविषयी चर्चा केली. पुणे-बेंगळूर हा कॉरिडॉर विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वेमंत्रालयाने या रेल्वे कॉरिडॉरचा विकास केल्यास रेल्वेचा महसूल वाढण्यास मदत होईल. या कॉरिडॉरमध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, धारवाड यासह इतर मोठ्या शहरांचा समावेश असल्यामुळे रेल्वेने याबाबत विचार करावा, असेही त्यांनी रेल्वेमंत्र्यांना सांगितले. रेल्वेमंत्र्यांनीही या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद दिला.