संत तुकोबांच्या पालखी सोबत चालले अजितदादा; बारामतीपासून काटेवाडीपर्यंत वारकऱ्यांसोबत दिंडीत

अजितदादांनी केले पालखी रथाचे सारथ्य शिवाजीराव ताटे बारामती जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती येथे उपमुख्यमंञी अजित पवार आणि खासदार सुनेत्राताई पवार यांनी तुकोबारायांच्या पादुकांची पुजा करून सपत्निक दर्शन घेतले. त्यानंतर अजित पवार यांनी वारकऱ्यांच्या बरोबर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या घोषात भक्तिमय वातावरणात हातात टाळ घेऊन भजन म्हणत काटेवाडीकडे प्रस्थान केले. काटेवाडी येथे पालखी रथाचे सारथ्यही त्यांनी […]

संत तुकोबांच्या पालखी सोबत चालले अजितदादा; बारामतीपासून काटेवाडीपर्यंत वारकऱ्यांसोबत दिंडीत

अजितदादांनी केले पालखी रथाचे सारथ्य
शिवाजीराव ताटे बारामती
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती येथे उपमुख्यमंञी अजित पवार आणि खासदार सुनेत्राताई पवार यांनी तुकोबारायांच्या पादुकांची पुजा करून सपत्निक दर्शन घेतले. त्यानंतर अजित पवार यांनी वारकऱ्यांच्या बरोबर ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या घोषात भक्तिमय वातावरणात हातात टाळ घेऊन भजन म्हणत काटेवाडीकडे प्रस्थान केले. काटेवाडी येथे पालखी रथाचे सारथ्यही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले कि, अलिकडे बरेच जण पालखी बरोबर जात आहेत. मी सुद्धा बारामतीपासून काटेवाडीपर्यंत पायी वारकऱ्यासोबत जाणार आहे. त्याप्रमाणे पवार यांनी तुकाराम महाराजांच्या पालखीचे सपत्निक पुजा करून दर्शन घेतले त्यानंतर ते वारकऱ्या सोबत दिंडीत सामील झाले. डोक्यावर पटका, पांढरी कपडे त्यावर जाकीट, कपाळाला गंध आणि हातात टाळ घेऊन त्यांनी भक्तीभावाने तुकोबांच्या पादुकांना पुष्पहार अर्पण केला.
त्यानंतर विठुनामाचा गजर करीत वारकऱ्यांशी संवाद साधला. दिंडीसोबत टाळ वाजवित बारामती येथुन पायी चालण्यास प्रांरंभ केला. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार सुनेत्रा पवार, त्यांचे खाजगी सचिव हनुमंत पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक संजय जाधव, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, महावितरणचे सुनिल पावडे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, उपविभागिय पोलीस अधिकारी राठोड तसेच अन्य पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत होते. काटेवाडीपर्यंत विठ्ठल ! विठ्ठल ! विठ्ठल!! ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात त्यांनी पायी चालत दिंडी चालक, वारकरी यांच्याशी संवाद साधला.