Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री करणार विठ्ठल -रखुमाईची पूजा
कार्तिकी एकादशीला कार्तिकी यात्रे निमित्त पंढरपुरात श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा केली जाते. ही पूजा राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते केली जाते. मात्र यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यामुळे कोणाला महापूजेचा मान द्यावा सकल मराठा बांधवानी शासकीय महापूजेला विरोध केल्यामुळे हा मोठा प्रश्न होता.
मात्र जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यावर मराठा समाजाच्या पाचही मागण्या मान्य केल्या आणि मराठा समाजांन आंदोलन मागे घेतले.
यंदा कार्तिकी एकादशी 23 नोव्हेंबर रोजी आहे. कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार आहे. अशी माहिती पंढरपूरच्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
Edited by – Priya Dixit