बहिणींना कधीपासून मिळणार 2100 रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना राज्य सरकार दरमहा 1500 रुपये खात्यात देते. या योजनेत निवडणुकांच्या पूर्वी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याची घोषणा …

बहिणींना कधीपासून मिळणार 2100 रुपये, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितले

राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत गरजू महिलांना राज्य सरकार दरमहा 1500 रुपये खात्यात देते. या योजनेत निवडणुकांच्या पूर्वी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. 

ALSO READ: ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले
नुकतेच महाराष्ट्राचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले मात्र अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याने या योजनेवरून चर्चा केली जात आहे. विरोधक या योजनेबाबत टीका करत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न केला जात आहे. 

ALSO READ: महाराष्ट्राला मोठी भेट, केंद्राकडून हाय-स्पीड हायवे प्रकल्पाला मंजुरी, ४५०० कोटी रुपये खर्च होणार
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आम्ही कधीही 2100 रुपये देणार नाही असे म्हटले नाही. ते कधी द्यायचे हे आर्थिक परिस्थिती पाहून सांगू. आम्ही देणार आहोत. यावर आमचे काम सुरु आहे. 

Edited By – Priya Dixit

ALSO READ: कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन होणार, फडणवीस सरकारने दिला हिरवा कंदील

Go to Source