डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

9 पैशांनी रुपया नुकसानीत : विदेशी वस्तुंची खरेदी होणार महाग वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची 9 पैशांची घसरण झाली आणि तो प्रति डॉलर 83.53 रुपये या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. यापूर्वी 22 मार्च 2024 रोजी रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.45 ही नीचांकी पातळी गाठली होती. तज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अमेरिकन डॉलरला […]

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण

9 पैशांनी रुपया नुकसानीत : विदेशी वस्तुंची खरेदी होणार महाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची 9 पैशांची घसरण झाली आणि तो प्रति डॉलर 83.53 रुपये या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. यापूर्वी 22 मार्च 2024 रोजी रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.45 ही नीचांकी पातळी गाठली होती. तज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अमेरिकन डॉलरला पाठिंबा मिळत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानेही डॉलर मजबूत होत आहे. रुपयाची घसरण म्हणजे भारतासाठी वस्तूंची आयात महाग होणार आहे. याशिवाय विदेशात फिरणे आणि अभ्यास करणेही महाग झाले आहे. समजा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते, तर अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळू शकतो. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 83.53 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार असल्याचे संकेत आहेत.
चलनाचे मूल्य कसे ठरवले जाते?
जर डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाचे मूल्य कमी झाले तर त्याला चलन पडणे, तुटणे, कमजोर होणे असे म्हणतात. इंग्रजीत त्याला चलन घसारा म्हणतात. प्रत्येक देशाकडे परकीय चलन साठा असतो ज्याद्वारे ते आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात. परकीय गंगाजळीतील वाढ आणि घट यांचा परिणाम चलनाच्या किमतीवर दिसून येतो.
भारताच्या परकीय गंगाजळीतील डॉलरचे मूल्य आणि अमेरिकेच्या परकीय गंगाजळीतील रुपयाचे मूल्य समान असेल तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील. आपला डॉलर कमी झाला तर रुपया कमजोर होईल; जर ते वाढले तर रुपया मजबूत होईल.