नील बॉईज हिंडलगाकडे डेपो मास्टर्स चषक

बेळगाव : डेपो मास्टर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित आनंद पाटील पुरस्कृत डेपो मास्टर्स चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नील बॉईज हिंडलगाने झारा इलेव्हनचा 12 धावांनी पराभव करुन डेपो मास्टर्स चषक पटकाविला. तनिष्क नाईकला सामनावीर तर साकिब लंगोटीला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. एसकेईच्या प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मराठा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना […]

नील बॉईज हिंडलगाकडे डेपो मास्टर्स चषक

बेळगाव : डेपो मास्टर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित आनंद पाटील पुरस्कृत डेपो मास्टर्स चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत नील बॉईज हिंडलगाने झारा इलेव्हनचा 12 धावांनी पराभव करुन डेपो मास्टर्स चषक पटकाविला. तनिष्क नाईकला सामनावीर तर साकिब लंगोटीला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. एसकेईच्या प्लॅटिनम जुबली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मराठा स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 8 गडी बाद 79 धावा केल्या. त्यात महांतेशने 2 षटकारांसह 19, सारांश राघुचेने 1 षटकार, 1 चौकारासह 13 तर प्रसाद नाकाडी व गणेश यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. नील बॉईज हिंडलगातर्फे सुशांत कोवाडकर, दीपक एन., अझर व तनिष्क यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईज संघाने 8.4 षटकात 4 गडी बाद 80 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात साकिबने 4 षटकार, 2 चौकारांसह 40, सुशांत कोवाडकरने 17 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे किरण तारळेकरने 2 गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अयोध्या कडोलीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 80 धावा केल्या. त्यात आनंदने 31, मनोजने 15 तर अभी कुट्रेने 12 धावा केल्या. झारातर्फे रब्बानी दफेदारने 2 तर रोहित व संतोष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झाराने 9.1 षटकात 5 गडी बाद 92 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. त्यात संतोष सुळगे पाटीलने 28 तर अझरने 27 धावा केल्या. निल बॉईजतर्फे आकाश कटांबळेने व गजानन यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. अंतिम सामन्यात नील बॉईज हिंडलगाने 10 षटकात 4 गडी बाद 110 धावा केल्या. त्यात तनिष्कने 37, सुशांतने 24, अझरने 22 तर शाहीदने 15 धावा केल्या. झारातर्फे संतोष सुळगे-पाटील व रोहित यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झाराने 10 षटकात 5 गडी बाद 98 धावा केल्या. त्यात रब्बानीने 3 षटकार, 2 चौकारांसह 39, साहूने 2 षटकार, 1 चौकारासह 26 तर संतोष सुळगे-पाटीलने 16 धावा केल्या. नील बॉईजतर्फे सुशांत कोवाडकरने 2 तर दीपक व तन्वीर यांनी 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे पुरस्कर्ते आनंद एन. पाटील, आनंद सराफ, ए. बी. शिंत्रे, रवी पाटील, मंगेश खुशे, कमल मल्होत्रा, प्रशांत कलघटकर, सारंग राघोचे, अमरदीप पाटील, विशाल पेडणेकर, गजानन जैनोजी आदींच्या हस्ते विजेत्या नील बॉईज संघाला 51 हजार रुपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या झारा संघाला 25,500 रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर तनिष्क नाईक (नील बॉईज), उत्कृष्ट गोलंदाज सुशांत कोवाडकर (नील बॉईज), उत्कृष्ट फलंदाज आनंदराज (मराठा स्पोर्ट्स) यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तर मालिकावीर साकिब लंगोटीला सायकल व चषक देऊन गौरविण्यात आले. सामन्यासाठी पंच म्हणून सुनील पाटील (कोल्हापूर), सागर कोलेकर व जोतिबा पवार यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डेपो मास्टर्सच्या पदाधिकाऱ्यांनी  परिश्रम घेतले.