महिलेसोबत सापडल्याने ‘डीएसपीं’चे डिमोशन
उन्नावचे डेप्युटी एसपी बनले कॉन्स्टेबल
वृत्तसंस्था/ उन्नाव
उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची पदावनती (डिमोशन) करण्यात आली. हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना थेट डेप्युटी एसपी पदावरून हवालदार बनवण्यात आले आहे. उन्नावचे तत्कालीन सीओ कृपाशंकर कनोजिया यांच्या कृतीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची अधिकारी ते हवालदार अशी पदावनती झाली आहे. उन्नावचे सीओ म्हणून पदोन्नत झालेले कृपाशंकर कनोजिया यांना गोरखपूरमध्ये कॉन्स्टेबलच्या मूळ पदावर परत पाठवण्यात आले आहे. शनिवारी यासंबंधी आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात आले. अहवालानुसार, कृपाशंकर कनोजिया यांनी 6 जुलै 2021 रोजी उन्नाव पोलीस अधीक्षकांकडे कौटुंबिक समस्यांचे कारण देत रजा मागितली होती. रजा मंजूर झाल्यानंतर ते घरी न जाता कानपूरमधील एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत निदर्शनास आले होते. यावेळी त्यांनी आपले सरकारी आणि खासगी मोबाईल नंबर बंद ठेवले होते. मोबाईल नंबर बंद असल्याने काळजीत पडलेल्या पत्नीने पोलीस कार्यालयात चौकशी केली असता ते रजा घेऊन घरी गेल्याचे समजले. सखोल चौकशीअंती ते एका हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता याप्रकरणी त्यांचे डिमोशन करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी महिलेसोबत सापडल्याने ‘डीएसपीं’चे डिमोशन
महिलेसोबत सापडल्याने ‘डीएसपीं’चे डिमोशन
उन्नावचे डेप्युटी एसपी बनले कॉन्स्टेबल वृत्तसंस्था/ उन्नाव उत्तर प्रदेशातील उन्नावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची पदावनती (डिमोशन) करण्यात आली. हॉटेलमध्ये महिला कॉन्स्टेबलसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांना थेट डेप्युटी एसपी पदावरून हवालदार बनवण्यात आले आहे. उन्नावचे तत्कालीन सीओ कृपाशंकर कनोजिया यांच्या कृतीमुळे पोलिसांची प्रतिमा डागाळल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची अधिकारी ते […]