खडेबाजार येथील ड्रेनेजची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
बेळगाव : खडेबाजार येथील हिंदी प्रचारसभा कार्यालय तसेच रेमंडस् शोरुमच्या बाजूला ड्रेनेजचे पाणी साचून आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबर तसेच ब्लॉक झालेल्या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून ड्रेनेजचे पाणी त्याठिकाणी साचून आहे. रेमंडस् शोरुमच्या बाजूला असलेल्या पॅसेजमध्ये व हिंदी प्रचार सभा भवनच्या प्रवेशद्वारासमोर पाणी साचून असल्याने व्यापाऱ्यांना ये-जा करणे अवघड झाले आहे. दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने या ठिकाणी थांबणेदेखील कठीण झाले. तेव्हा तातडीने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी खडेबाजार येथील ड्रेनेजची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
खडेबाजार येथील ड्रेनेजची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी
बेळगाव : खडेबाजार येथील हिंदी प्रचारसभा कार्यालय तसेच रेमंडस् शोरुमच्या बाजूला ड्रेनेजचे पाणी साचून आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून दिवसेंदिवस ही समस्या गंभीर बनली आहे. तेव्हा तातडीने ड्रेनेज चेंबर तसेच ब्लॉक झालेल्या चेंबरची दुरुस्ती करावी, अशी मागणी या परिसरातील व्यावसायिकांनी व नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून ड्रेनेजचे पाणी त्याठिकाणी साचून आहे. रेमंडस् […]
