क. नंदगड क्रॉसजवळ गतिरोधक घालण्याची मागणी
वाहने सुसाट : खानापूर-यल्लापूर मार्गावर वाढते अपघात
वार्ताहर /नंदगड
खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड क्रॉसवर नेहमीच लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे कसबा नंदगड क्रॉसजवळ गतिरोधक बसवावा, अशी मागणी या भागातील जनतेसह वाहनधारकांतून होत आहे. नंदगड पोलीस स्टेशनपासून कसबा नंदगड क्रॉस केवळ एक किलोमीटरवर आहे. या क्रॉसहून हा रस्ता कसबा नंदगड गावातून पुढे सागरेमार्गे बिडी येथे जातो. त्यामुळे या भागातील लोकांना हा सोयीचा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने एखाद्यावेळी कसबा नंदगड गावातून दुचाकी व चारचाकी आल्यास केव्हा एकदा अपघात होईल याची शाश्वती नसते. या ठिकाणी बरेच अपघात झाले आहेत. वाहने जोराने येत असल्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी क्रॉसच्या दोन्ही बाजूला खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावर गतिरोधक बसविणे गरजेचे असल्याची मागणी या भागातील जनतेतून होत आहे. या रस्त्यालगत हायस्कूल आहे. हायस्कूलचे विद्यार्थी नेहमी या रस्त्यावर येत असतात. तसेच या रस्त्यावर मोठी रहदारी असते. त्यामुळे कसबा नंदगड बसथांब्याजवळ गतिरोधक घालणे गरजेचे आहे.
Home महत्वाची बातमी क. नंदगड क्रॉसजवळ गतिरोधक घालण्याची मागणी
क. नंदगड क्रॉसजवळ गतिरोधक घालण्याची मागणी
वाहने सुसाट : खानापूर-यल्लापूर मार्गावर वाढते अपघात वार्ताहर /नंदगड खानापूर-यल्लापूर राज्य मार्गावरील कसबा नंदगड क्रॉसवर नेहमीच लहान मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे कसबा नंदगड क्रॉसजवळ गतिरोधक बसवावा, अशी मागणी या भागातील जनतेसह वाहनधारकांतून होत आहे. नंदगड पोलीस स्टेशनपासून कसबा नंदगड क्रॉस केवळ एक किलोमीटरवर आहे. या क्रॉसहून हा रस्ता कसबा नंदगड गावातून पुढे सागरेमार्गे बिडी […]