भटक्या जमातीला घरे मंजूर करून देण्याची मागणी

बेळगाव : बेळवडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या के. बी. पट्टीहाळ क्रॉस येथे मुल्लानम•ाrत वास्तव्यास असणाऱ्या भटक्या जमातीला जागा मंजूर करून घरे बांधून देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य भटकी जमात महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळवडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या सदर जागेमध्ये भटक्या जमातीतील नागरिक गेल्या 15-20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्लास्टीकच्या झोपड्या घालून वास्तव्यास असणाऱ्या […]

भटक्या जमातीला घरे मंजूर करून देण्याची मागणी

बेळगाव : बेळवडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीत येणाऱ्या के. बी. पट्टीहाळ क्रॉस येथे मुल्लानम•ाrत वास्तव्यास असणाऱ्या भटक्या जमातीला जागा मंजूर करून घरे बांधून देण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य भटकी जमात महासंघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. बेळवडी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या सदर जागेमध्ये भटक्या जमातीतील नागरिक गेल्या 15-20 वर्षांपासून वास्तव्यास आहेत. प्लास्टीकच्या झोपड्या घालून वास्तव्यास असणाऱ्या या नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. ऊन, पाऊस, थंडीमध्ये असेच दिवस काढावे लागत आहेत. सदर समाजातील नागरिकांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित रहावे लागले आहे. मूलभूत सुविधा देण्याबरोबरच वीजपुरवठा करण्यात यावा, नागरिकांना पक्की घरे बांधून देण्यात यावीत. झोपडपट्टीमुक्त राज्य बनविण्याचा सरकारने आदेश दिला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांचा लाभ मिळत नसल्याने नागरिक मागासलेले आहेत. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने घरासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.