हलात्री बंधाऱ्यावरील गळती त्वरित थांबवण्याची मागणी

खानापूर : मलप्रभा-हलात्री नदी संगमाजवळील फलोद्यान खात्याच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने पुढील दोन महिन्यात या बंधाऱ्यात पाणी राहणार नसल्याने शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या बंधाऱ्यातील गळतीची दुरुस्ती करून पाणी योग्यप्रकारे अडवण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे. हलात्री मलप्रभा नदी संगमाजवळ पाटबंधारे खात्याने शेतीसाठी […]

हलात्री बंधाऱ्यावरील गळती त्वरित थांबवण्याची मागणी

खानापूर : मलप्रभा-हलात्री नदी संगमाजवळील फलोद्यान खात्याच्या शेजारी असलेल्या बंधाऱ्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने पुढील दोन महिन्यात या बंधाऱ्यात पाणी राहणार नसल्याने शेतकऱ्यांतून भीती व्यक्त होत आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या बंधाऱ्यातील गळतीची दुरुस्ती करून पाणी योग्यप्रकारे अडवण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे. हलात्री मलप्रभा नदी संगमाजवळ पाटबंधारे खात्याने शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून लहान बंधारा बांधलेला आहे. या बंधाऱ्यातील पाण्यामुळे असोगा, मणतुर्गा, तिवोली, हारुरी, शेडेगाळी गावातील शेतीला पाणीपुरवठा होतो. मात्र गेल्या वर्षापासून या बंधाऱ्यातून मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने या बंधाऱ्यात योग्य पद्धतीने पाणी अडवण्यात येत नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटीच बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने बंधारा सुका पडतो. त्यामुळे या भागातील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. यावर्षीही पाटबंधारे खात्याने पाणी अडवताना योग्य नियोजन न केल्याने पाणी वाहून जात आहे. त्यामुळे पुढील महिन्याभरात या बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहणार नसल्याने यावर्षीही पिकांचे नुकसान होणार आहे. यासाठी पाटबंधारे खात्याने तातडीने या बंधाऱ्याची दुरुस्ती करून पाणी अडवण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांतून होत आहे.