बसवेश्वर सर्कलमध्ये गतिरोधकाची मागणी

भरधाव वाहनांमुळे अपघातांना निमंत्रण : दोघांनी गमावला जीव बेळगाव : आरपीडी चौकातून भरधाव येणारी वाहने गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलमध्ये वेगानेच येत आहेत. नव्या काँक्रीटच्या रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यात गोवावेस येथे तीन ते चार अपघात झाले असून, दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गोवावेस येथील […]

बसवेश्वर सर्कलमध्ये गतिरोधकाची मागणी

भरधाव वाहनांमुळे अपघातांना निमंत्रण : दोघांनी गमावला जीव
बेळगाव : आरपीडी चौकातून भरधाव येणारी वाहने गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलमध्ये वेगानेच येत आहेत. नव्या काँक्रीटच्या रस्त्यावर कोठेही गतिरोधक नसल्याने या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील सहा महिन्यात गोवावेस येथे तीन ते चार अपघात झाले असून, दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे गोवावेस येथील स्विमिंग पूल परिसरात गतिरोधक घालावा, अशी मागणी वाहनचालकांमधून केली जात आहे. काँक्रीटचे रस्ते झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. आरपीडी चौकपासून बसवेश्वर सर्कलकडे जाताना कोठेही गतिरोधक नसल्याने भरधाव वेगाने वाहने ये-जा करीत आहेत. बऱ्याच वेळा भरधाव वाहने जात असताना गोवावेस स्विमिंग पूल येथून एखादे वाहन आडवे आल्यास अपघात होत आहे. रात्रीच्यावेळी तर वाहनांच्या वेगावर मर्यादा नसल्याने पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडणे कठीण होत आहे.
गतिरोधक नसल्याने वाहनांच्या वेगात वाढ
यापूर्वी डांबरी रस्ता असताना पंचवटी मंदिर येथे गतिरोधक होता. त्यामुळे वाहनांची गती कमी होत होती. परंतु, सध्या गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग वाढला असून परिसरातील रहिवासी व पादचाऱ्यांना धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गोवावेस स्विमिंग पूल कॉर्नर परिसरात एखादा गतिरोधक घालण्याची मागणी केली जात आहे.