कामत गल्ली स्मशानभूमीत शेडची मागणी
बेळगाव : एस. पी. ऑफिस रोड येथील कामत गल्ली स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना पावसाचा अडसर येत आहे. स्मशानभूमीत सर्वत्र पावसाचे पाणी साचले असून या ठिकाणी शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी कामत गल्ली विभागातून करण्यात येत आहे. अंत्यसंस्कारासाठी नेहमी गर्दी होते. परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. त्याठिकाणीच शेड नसल्याने वारा व जोरदार पावसामध्ये अंत्यसंस्कार करणे कठीण होते. मागील अनेक दिवसांपासून शेड नसल्याने अंत्यसंस्कार कसे करावेत, असा प्रश्न नागरिकांसमोर असतो.त्यामुळे कामत गल्ली स्मशानभूमी येथे शेड उभारण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
Home महत्वाची बातमी कामत गल्ली स्मशानभूमीत शेडची मागणी
कामत गल्ली स्मशानभूमीत शेडची मागणी
बेळगाव : एस. पी. ऑफिस रोड येथील कामत गल्ली स्मशानभूमीत शेड नसल्यामुळे अंत्यसंस्कार करताना पावसाचा अडसर येत आहे. स्मशानभूमीत सर्वत्र पावसाचे पाणी साचले असून या ठिकाणी शेडची व्यवस्था करावी, अशी मागणी कामत गल्ली विभागातून करण्यात येत आहे. अंत्यसंस्कारासाठी नेहमी गर्दी होते. परंतु ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. त्याठिकाणीच शेड नसल्याने वारा व जोरदार पावसामध्ये अंत्यसंस्कार […]