ओत्तोळी रस्ता नव्याने करण्याची मागणी
डागडुजीसाठी आलेल्या कंत्राटदाराला जाब विचारून ग्रामस्थांनी पाठवले परत
खानापूर : ओत्तोळी गावच्या संपर्क रस्त्याच्या डागडुजीसाठी आलेल्या कंत्राटदाराला ग्रामस्थांनी जाब विचारत संपूर्ण रस्ता नव्याने करण्याची मागणी करत कंत्राटदाराला परतून लावले आहे. याबाबत माहिती अशी की, खानापूर-जांबोटी राज्य महामार्गावर असलेल्या ओत्तोळी गावचा संपर्क रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 20 लाखाचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून 800 मीटर संपर्क रस्ता खडीकरण आणि डांबरीकरण करण्याचे होते. रस्त्याच्या डांबरीकरणावेळी ग्रामस्थांनी काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे निदर्शनास आणून देत. कंत्राटदाराला जाब विचारला होता. मात्र कंत्राटदाराने हा रस्ता आपल्या पद्धतीने केला होता. यानंतर अवघ्या दोन महिन्यातच नव्याने तयार केलेला रस्ता संपूर्णपणे उखडून गेल्याने ग्रामस्थांनी या विरोधात जिल्हा पंचायतीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देवून रस्ता पुन्हा योग्य दर्जाचा करण्याची मागणी केली होती.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा पंचायतीच्या कार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदाराला रस्ता पुन्हा करण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार कंत्राटदाराने ओत्तोळी गावच्या संपर्क रस्त्यावरील पडलेल्या ख•dयात डागडुजी करण्यासाठी काम सुरू केले होते. यावेळी ग्रामस्थांनी या कामाविरोधात आक्षेप घेत संपूर्ण रस्ता नव्याने करण्याचा आग्रह धरला आणि कंत्राटदाराला पॅचवर्क करण्यापासून रोखून धरुन परत पाठवले आहे. जर कंत्राटदाराने येत्या आठ दिवसात संपूर्ण रस्ता योग्य पद्धतीने केला नसल्यास याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचे ग्रा.पं. सदस्य परशराम गावडे, लक्ष्मण शेंगाळे, संजय रामणीचे यांनी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’शी बोलताना सांगितले. यावेळी मारुती हटकर, विष्णू गावडे, महादेव गावडे, कल्लाप्पा मुतगेकर, पुंडलिक बामणे, तुकाराम गावडे, लक्ष्मण गावडे, बाळू गावडे, रामदेव गावडे यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी ओत्तोळी रस्ता नव्याने करण्याची मागणी
ओत्तोळी रस्ता नव्याने करण्याची मागणी
डागडुजीसाठी आलेल्या कंत्राटदाराला जाब विचारून ग्रामस्थांनी पाठवले परत खानापूर : ओत्तोळी गावच्या संपर्क रस्त्याच्या डागडुजीसाठी आलेल्या कंत्राटदाराला ग्रामस्थांनी जाब विचारत संपूर्ण रस्ता नव्याने करण्याची मागणी करत कंत्राटदाराला परतून लावले आहे. याबाबत माहिती अशी की, खानापूर-जांबोटी राज्य महामार्गावर असलेल्या ओत्तोळी गावचा संपर्क रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 20 लाखाचा निधी मंजूर झाला होता. या निधीतून 800 मीटर संपर्क रस्ता […]