शिळ्या पोळीपासून बनवा दोन स्वादिष्ट गोड पदार्थ

लाडू साहित्य- तीन- शिळ्या पोळ्या तीन -टेबलस्पून तूप अर्धा कप-गूळ वेलची पूड सुके मेवे

शिळ्या पोळीपासून बनवा दोन स्वादिष्ट गोड पदार्थ

लाडू 

साहित्य- 

तीन- शिळ्या पोळ्या 

तीन -टेबलस्पून तूप

अर्धा कप-गूळ 

वेलची पूड 

सुके मेवे

 

कृती- 

सर्वात आधी पोळ्या मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता कढईत तूप गरम करा आणि त्यात बारीक केलेल्या पोळ्या घाला. आता किसलेला गूळ घाला आणि मिश्रण एकसारखे होईपर्यंत मिसळत रहा. आता वेलची पूड आणि सुके मेवे घाला. व आता मिश्रणातून छोटे लाडू बनवा. तर चला तयार आहे शिळ्या पोळीचे गोड लाडू रेसीपी. 

 

खीर 

साहित्य

दोन-शिळ्या पोळ्या 

अर्धा- लिटर दूध

तीन -टेबलस्पून साखर

वेलची पूड 

सुके मेवे

ALSO READ: Healthy and tasty recipe सत्तूचे लाडू

कृती- 

सर्वात पोळ्यांचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आता हे तुकडे दुधामध्ये घाला.व मंद आचेवर शिजवा. आता त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घाला.व वरून सुके मेवे

घाला. तर चला तयार आहे आपली शिळ्या पोळीची खीर रेसिपी, गरम किंवा थंड सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: Sweet Dish चविष्ट केळीची खीर