राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज दिल्ली कॅपिटल्सला विजय गरजेचा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्ली कॅपिटल्सची गाठ आज मंगळवारी राजस्थान रॉयल्सशी पडणार असून आयपीएलच्या प्लेऑफसाठीच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना विजय अत्यावश्यक आहे. त्यासाठी रिषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या धडाक्याची त्यांना गरज पडणार आहे. कॅपिटल्सने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. 11 सामन्यांपैकी पाच त्यांनी जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. पंतच्या संघास उर्वरित तीन सामने जिंकणे अत्यावश्यक […]

राजस्थान रॉयल्सविरुद्ध आज दिल्ली कॅपिटल्सला विजय गरजेचा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली कॅपिटल्सची गाठ आज मंगळवारी राजस्थान रॉयल्सशी पडणार असून आयपीएलच्या प्लेऑफसाठीच्या शर्यतीत राहण्यासाठी त्यांना विजय अत्यावश्यक आहे. त्यासाठी रिषभ पंत आणि जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या धडाक्याची त्यांना गरज पडणार आहे. कॅपिटल्सने आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी केलेली नाही. 11 सामन्यांपैकी पाच त्यांनी जिंकले आहेत आणि सहा गमावले आहेत. पंतच्या संघास उर्वरित तीन सामने जिंकणे अत्यावश्यक असले, तरी तशा स्थितीत ते केवळ 16 गुणांपर्यंत पोहोचतील. ते स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यासाठी पात्र ठरण्यास पुरेसे ठरेल याची खात्री नाही.
कारण केकेआर (11 सामन्यांमधून 16) आणि राजस्थान रॉयल्स (10 सामन्यांमधून 16) यांच्याव्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज (11 सामन्यांतून 12), सनरायझर्स हैदराबाद (10 सामन्यांमधून 12) आणि लखनौ सुपर जायंट्स (11 सामन्यांतून 12) हे तीन संघ असे आहेत जे 16 गुणांच्या पलीकडे जाऊ शकतात. फिरोझशहा कोटलाच्या पाटा खेळपट्टीवर दिल्लीसमोर दुहेरी आव्हान असेल. एका बाजूने खलील अहमद, इशांत शर्मा आणि कुलदीप यादव यांनी यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन्स आणि रियान पराग यांना आटोक्यात ठेवावे अशी पंतची इच्छा असेल. परंतु एका बाजूला सीमारेषा केवळ 60 मीटरवर असल्याने ते सोपे जाणार नाही.
380 धावा काढलेला आणि तीन प्रभावी अर्धशतके नोंदविलेला पंत पुन्हा एकदा चांगली कामगिरी करून दाखवू पाहेल. त्याला ऑस्ट्रेलियन खेळाडू फ्रेझर-मॅकगर्ककडून साथ अपेक्षित असेल. तो मागील काही सामन्यांत चमकलेला नसला, तरी हे दोन फलंदाज खेळाचा रंग बदलू शकतात. परंतु दिल्लीला रॉयल्सच्या माऱ्यासमोर सावधपणे उभे राहावे लागेल. युजवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विनसारख्या फिरकीपटूंचा सामना करणे सोपे नाही. त्याशिवाय त्यांच्याकडे अनुभवी मध्यमगती गोलंदाज संदीप शर्मा आहे.
 
राजस्थानच्या गोलंदाजीने चांगला इकोनॉमी रेट राखण्यात यश मिळवले आहे. दिल्लीतर्फे फक्त अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना बऱ्यापैकी बांधून ठेवण्याची क्षमता दाखवली आहे. खलील आणि मुकेश कुमार यांनीही अधिक सातत्य दाखविण्याची वेळ आली असून दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज लिझाद विल्यम्स आणि एन्रिक नॉर्टजे हे खूप महाग ठरलेले आहेत. दोन्ही संघांची शेवटची भेट मार्चमध्ये जयपूरमध्ये झाली होती आणि त्यात गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात दिल्लीने नियंत्रण गमावले होते. सदर सामन्यात रियान परागने शानदार खेळी केली होती. राजस्थान रॉयल्सकडील रियान, कर्णधार संजू सॅमसन, धडाकेबाज यशस्वी, फिनिशर रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल यांचा समावेश असलेली फलंदाजी पाहता दिल्लीच्या गोलंदाजांच्या मनात धास्ती निश्चितच असेल.
संघ : दिल्ली कॅपिटल्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अभिषेक पोरेल, रिकी भुई, यश धूल, शाई होप, पृथ्वी शॉ, ट्रिस्टन स्टब्स, कुमार कुशाग्र, स्वस्तिक चिकारा, इशांत शर्मा, झ्ये रिचर्डसन, रसिख दार सलाम, विकी ओस्तवाल, एन्रिक नॉर्टजे, मुकेश कुमार, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, खलील अहमद, सुमित कुमार, अक्षर पटेल, मिचेल मार्श, ललित यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.