संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज गोव्यात

पणजी : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज मंगळवार दि. 5 मार्च रोजी गोवा भेटीवर येत असून आयएनएस मांडवी – वेरे येथे बांधण्यात आलेल्या नौदल कॉलेज इमारतीचे ते दुपारी 12 वा. उद्घाटन करणार आहेत. तिन्ही संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ते कॉलेज महत्त्वाचे असून देशाकरीता ते महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नौदल, हवाई दल, लष्करातील अधिकारी […]

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज गोव्यात

पणजी : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज मंगळवार दि. 5 मार्च रोजी गोवा भेटीवर येत असून आयएनएस मांडवी – वेरे येथे बांधण्यात आलेल्या नौदल कॉलेज इमारतीचे ते दुपारी 12 वा. उद्घाटन करणार आहेत. तिन्ही संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी ते कॉलेज महत्त्वाचे असून देशाकरीता ते महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नौदल, हवाई दल, लष्करातील अधिकारी वर्गास प्रशिक्षण देण्याची सोय तेथे करण्यात आली असून तेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची योग्य त्या ठिकाणी देशभरात नियुक्ती केली जाणार आहे. गोवा राज्यात अशा प्रकारे सशस्त्र दलातील अधिकारी वर्गास प्रशिक्षण देणारे हे पहिलेच केंद्र आहे.