चीनमध्ये सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा

चीनने आणखी एक कामगिरी करून दाखविली आहे. चीनने यावेळी जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केली असून याचे नाव जिनपिंग अंडरग्राउंड लॅब ठेवण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत काम करणे देखील सुरू केले आहे. अशाप्रकारची लीब जगात अन्य कुठेच वैज्ञानिकांसाठी उपलब्ध नाही. चीनच्या सिचुआन प्रांतात ही लॅब तयार करण्यात आली असून ती […]

चीनमध्ये सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा

चीनने आणखी एक कामगिरी करून दाखविली आहे. चीनने यावेळी जगातील सर्वात खोल आणि सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा तयार केली असून याचे नाव जिनपिंग अंडरग्राउंड लॅब ठेवण्यात आले आहे. वैज्ञानिकांनी या प्रयोगशाळेत काम करणे देखील सुरू केले आहे. अशाप्रकारची लीब जगात अन्य कुठेच वैज्ञानिकांसाठी उपलब्ध नाही.
चीनच्या सिचुआन प्रांतात ही लॅब तयार करण्यात आली असून ती पर्वताखाली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 1.5 मैल खोलवर आहे. याचे क्षेत्रफळ 120 ऑलिम्पिक आकाराच्या स्वीमिंग पूलइतके असल्याचे सांगण्यात येत आहे. लॅबमध्ये जाण्यासाठी भुयारीमार्गाद्वारे कारने पोहोचता येते. इटलीच्या ग्रॅन सॅसो नॅशनल लेबोरेटरीपेक्षा याचा आकार जवळपास दुप्पट आहे. इटलीची ग्रॅन सॅसो ही यापूर्वी जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळ होती.
ब्रह्मांडाच्या उकल न झालेले रहस्य ‘डार्क मॅटर’विषयी अध्ययन करण्यासाठी या प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रह्मांडाचा किमान एक चतुर्थांश हिस्सा डार्क मॅटरने निर्माण झाला असून हा जवळपास अदृश्य  पदार्थ आहे, जो प्रकाशाला शोषून घेत नाही तसेच त्याला परावर्तित किंवा उत्सर्जित देखील करत नसल्याचे मानले जाते.
त्याच्या वैशिष्ट्यामुळे डार्क मॅटरचा शोध घेणे अत्यंत कठिण ठरत असल्याचे युरोपीय न्युक्लियर रिसर्च ऑर्गनायझेशनचे सांगणे आहे. परंतु मॉडर्न सायन्सने डार्क मॅटरचे अस्तित्व सिद्ध केले आहे, परंतु कधीच याचा थेट स्वरुपात शोध लागलेला नाही. चीनच्या या प्रयोगशाळेला वैज्ञानिकांसाठी डार्क मॅटरचा शोध घेण्याच्या दृष्टीकोनातून एक आदर्श ‘अल्ट्रा-क्लीन’ ठिकाण मानण्यात येत आहे.
डार्क मॅटरविषयी शोध घेण्यात सर्व ब्रह्मांडीय किरणे अडथळा ठरतात, परंतु ही लॅब अत्यंत खोलवर असल्याने सर्व किरणे तिथपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, यामुळे वैज्ञानिकांना या रहस्यमय घटकाचे चांगल्याप्रकारे अध्ययन करण्यास मदत मिळणार आहे. इंजिनियरिंग फिजिक्सचे प्राध्यापक यू कियान यांच्यानुसार डार्क मॅटरच्या शोधासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरणार आहे.
 

Go to Source