पक्ष्यांच्या प्रजातींच्या नोंदीत घट
डिसेंबरमध्ये पडलेली धुक्याची चादर, विकासकामांमुळे पाणथळ जागा आणि गवताळ प्रदेशांच्या नाशामुळे ‘एमएमआर’मधील पक्ष्यांच्या (birds) प्रजातींच्या नोंदींत घट (decrease) झाल्याचे वास्तव उघड झाले आहे. ‘विंग्स’ पक्षी निरीक्षण कार्यक्रमादरम्यान ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ‘एमएमआर’मधील ‘विंग्स पक्षी निरीक्षण कार्यक्रमात पक्ष्यांच्या 215 प्रजातींची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी ही संख्या 250 इतकी होती.‘विंग्स’ पक्षी निरीक्षण कार्यक्रम रविवारी मुंबई (mumbai) आणि नवी मुंबईत (navi mumbai) पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुंबई महानगर प्रदेशात केवळ 215 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत पक्षी प्रजातींची संख्या कमी नोंदली आहे. यातही प्रामुख्याने एमएमआरमधील बहुतेक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदी कमी झाल्या आहेत. यात स्थानिक, तसेच स्थलांतरित अशा दोन्ही प्रजातींचा समावेश आहे, असे पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संजॉय मोंगा यांनी सांगितले.पक्षी निरीक्षणासाठी एमएमआरमधील पाणथळ क्षेत्र, डोंगराळ भाग, किनारपट्टी क्षेत्रांचा समावेश होता. यंदा पक्षी निरीक्षणात शाही गरुड, पट्टे कादंब, नकेर, राखी फटाकडी, मोठा टिलवा, बार टेल्ड गोडविट, पांढरा करकोचा आणि दयाळ या पक्ष्यांच्या नोंदींचा समावेश आहे.याआधी 2005 पासून हा कार्यक्रम ‘बर्ड रेस ऑफ इंडिया’ या नावाने आयोजित करण्यात येत होता. या संस्थेतर्फे भारतातील 14 शहरांमध्ये पक्षी निरीक्षण करण्यात येते. या कार्यक्रमात दरवर्षी 50 हून अधिक पक्षी निरीक्षक संघ सहभागी होतात. प्रत्येक संघातील व्यक्ती या कार्यक्रमात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी करतात. या नोंदी नंतर विंग्ज-बर्ड्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात येतात. दरम्यान, या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई महानगर प्रदेशात केवळ 215 पक्षी प्रजातींची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. बहुतेक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदीही कमी झाल्या आहेत.हेही वाचामुंबईतील मरीन ड्राइव्ह लवकरच 110 एलईडी दिव्यांनी उजळणार2032 मध्ये मुंबईवर लघुग्रहाचे सावट
Home महत्वाची बातमी पक्ष्यांच्या प्रजातींच्या नोंदीत घट
पक्ष्यांच्या प्रजातींच्या नोंदीत घट
डिसेंबरमध्ये पडलेली धुक्याची चादर, विकासकामांमुळे पाणथळ जागा आणि गवताळ प्रदेशांच्या नाशामुळे ‘एमएमआर’मधील पक्ष्यांच्या (birds) प्रजातींच्या नोंदींत घट (decrease) झाल्याचे वास्तव उघड झाले आहे.
‘विंग्स’ पक्षी निरीक्षण कार्यक्रमादरम्यान ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे. ‘एमएमआर’मधील ‘विंग्स पक्षी निरीक्षण कार्यक्रमात पक्ष्यांच्या 215 प्रजातींची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षी ही संख्या 250 इतकी होती.
‘विंग्स’ पक्षी निरीक्षण कार्यक्रम रविवारी मुंबई (mumbai) आणि नवी मुंबईत (navi mumbai) पार पडला. या कार्यक्रमादरम्यान मुंबई महानगर प्रदेशात केवळ 215 पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मुंबईत पक्षी प्रजातींची संख्या कमी नोंदली आहे.
यातही प्रामुख्याने एमएमआरमधील बहुतेक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदी कमी झाल्या आहेत. यात स्थानिक, तसेच स्थलांतरित अशा दोन्ही प्रजातींचा समावेश आहे, असे पक्षी निरीक्षण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संजॉय मोंगा यांनी सांगितले.
पक्षी निरीक्षणासाठी एमएमआरमधील पाणथळ क्षेत्र, डोंगराळ भाग, किनारपट्टी क्षेत्रांचा समावेश होता. यंदा पक्षी निरीक्षणात शाही गरुड, पट्टे कादंब, नकेर, राखी फटाकडी, मोठा टिलवा, बार टेल्ड गोडविट, पांढरा करकोचा आणि दयाळ या पक्ष्यांच्या नोंदींचा समावेश आहे.
याआधी 2005 पासून हा कार्यक्रम ‘बर्ड रेस ऑफ इंडिया’ या नावाने आयोजित करण्यात येत होता. या संस्थेतर्फे भारतातील 14 शहरांमध्ये पक्षी निरीक्षण करण्यात येते. या कार्यक्रमात दरवर्षी 50 हून अधिक पक्षी निरीक्षक संघ सहभागी होतात.
प्रत्येक संघातील व्यक्ती या कार्यक्रमात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पक्षी निरीक्षण करून त्यांच्या नोंदी करतात. या नोंदी नंतर विंग्ज-बर्ड्स ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात येतात. दरम्यान, या पक्षी निरीक्षण कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई महानगर प्रदेशात केवळ 215 पक्षी प्रजातींची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. बहुतेक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंदीही कमी झाल्या आहेत.हेही वाचा
मुंबईतील मरीन ड्राइव्ह लवकरच 110 एलईडी दिव्यांनी उजळणार
2032 मध्ये मुंबईवर लघुग्रहाचे सावट