डिसेंबरचे जीएसटी संकलन 1.64 लाख कोटी रुपये
चालू आर्थिक वर्षातील एकूण संकलन 14.97 लाख कोटींवर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मावळत्या वर्षाचा अखेरचा महिना डिसेंबरमधील वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलन 1.64 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. हे प्रमाण त्यापूर्वीच्या डिसेंबरपेक्षा 10 टक्के जास्त आहे. अशा प्रकारे सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांमध्ये या कराचे एकंदर संकलन 14.97 लाख कोटी आहे. ते त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये 13.40 लाख कोटी होते.
डिसेंबर 2023 मध्ये एकंदर संकलन 1 लाख 64 हजार 882 कोटी इतके झाले आहे. यापैकी 30,443 कोटी रुपये केंद्रीय कर, 37,935 कोटी रुपये राज्यस्तरीय कर तर 84,225 कोटी रुपये संयुक्त कर अशी विभागणी आहे. संयुक्त करसंकलनात 41,534 कोटी रुपयांच्या आयात कराचाही समावेश आहे. तसेच एकंदर करसंकलनात 1,079 कोटी रुपयांच्या अधिभाराचाही समावेश आहे.
सलग सातव्या महिन्यात…
सध्याचे आर्थिक वर्ष आतापर्यंत वस्तू-सेवा करसंकलनाच्या दृष्टीने लाभदायक ठरले आहे. गेले सलग सात महिने प्रत्येक महिन्यातील संकलन 1.60 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. या आर्थिक वर्षाच्या उर्वरित 3 महिन्यांमध्येही हाच कल राहिला तर ते 18 लाख कोटीची मर्यादा गाठू शकेल, अशी स्थिती आहे.
Home महत्वाची बातमी डिसेंबरचे जीएसटी संकलन 1.64 लाख कोटी रुपये
डिसेंबरचे जीएसटी संकलन 1.64 लाख कोटी रुपये
चालू आर्थिक वर्षातील एकूण संकलन 14.97 लाख कोटींवर वृत्तसंस्था / नवी दिल्ली मावळत्या वर्षाचा अखेरचा महिना डिसेंबरमधील वस्तू-सेवा कराचे (जीएसटी) संकलन 1.64 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. हे प्रमाण त्यापूर्वीच्या डिसेंबरपेक्षा 10 टक्के जास्त आहे. अशा प्रकारे सध्याच्या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांमध्ये या कराचे एकंदर संकलन 14.97 लाख कोटी आहे. ते त्यापूर्वीच्या आर्थिक […]