राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादंग

राज्यपालांनी केवळ दोन मिनिटांमध्ये अभिभाषण संपविले वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या छोट्या अभिभाषणावर युडीएफ आघाडीने नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने विधानसभेत राज्यपालांच्या छोट्या अभिभाषणाला ‘लोकशाहीची चेष्टा’ संबोधिले आहे. तसेच युडीएफने याला विधानसभेचा अपमानही ठरविले आहे. केरळ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. यावेळी राज्यपालांनी अभिभाषणाचा केवळ […]

राज्यपालांच्या अभिभाषणावरून वादंग

राज्यपालांनी केवळ दोन मिनिटांमध्ये अभिभाषण संपविले
वृत्तसंस्था /तिरुअनंतपुरम
केरळ विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या छोट्या अभिभाषणावर युडीएफ आघाडीने नाराजी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने विधानसभेत राज्यपालांच्या छोट्या अभिभाषणाला ‘लोकशाहीची चेष्टा’ संबोधिले आहे. तसेच युडीएफने याला विधानसभेचा अपमानही ठरविले आहे. केरळ विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. यावेळी राज्यपालांनी अभिभाषणाचा केवळ अखेरचा परिच्छेद वाचला आणि काही मिनिटातच ते विधानसभेतून बाहेर पडले होते. राज्यपाल हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी अभिभाषणाचा केवळ अखेरचा परिच्छेद वाचणार असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी 9.02 मिनिटाला स्वत:चे अभिभाषण पूर्ण केले आणि 9.04 वाजता ते विधानसभेतून बाहेर पडले. केवळ एक मिनिट 15 सेकंदांमध्ये त्यांनी अभिभाषण पूर्ण केले. राज्यपालांनी अभिभाषणाचा केवळ शेवटचा परिच्छेद वाचणे विधानसभेचा अपमान आहे. तसेच घटनेचे निर्देश आणि विधानसभेच्या नियमांचा अनादर आहे. राज्यपाल आणि राज्य सरकारदरम्यान सुरू असलेल्या ड्रामाचा हा परिणाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. केरळ विधानसभेतील उपविरोधी पक्षनेते पी.के. कुनालिकुट्टी आणि वरिष्ठ काँग्रेस नेते तिरुवनचूर राधाकृष्ण यांनीही याप्रकरणी नाराजी दर्शविली आहे.