देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल युट्युब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य करणे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली

देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल युट्युब चॅनलवर बदनामीकारक वक्तव्य करणे. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. किंचक नवले असे या आरोपीचे नाव आहे. 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दरम्यान या धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केले आहे. नवले याचा शोध सुरु होता. अखेर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सांताक्रूझ पोलिसांनी अटक केले. आणि वांद्रे न्यायालयात हजर केले. हे त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून केले आहे. या बाबत चौकशीसाठी पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

तसेच  हा प्रक्षोभक भाषा वापरून जिवे ठार मारण्याची धमकी देणारी वक्तव्ये असलेल्या व्हिडिओ आपल्या ‘एक्स’ हँडलवरून व्हायरल करत दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आधीपासून अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे  सोशल मीडिया सेलचे उपाध्यक्ष योगेश सावंत यांनाही या प्रकरणी न्यायालयाने 7  मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

 

Edited By- Priya Dixit  

 

Go to Source