लग्नाच्या चार दिवसानंतर नवरदेवाचा मृत्यू
काळ कधी कुठे कसा झडप घालेल हे सांगता येत नाही. सध्या लग्न सराय सुरु आहे. लग्नाच्या काळात बिहार मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात लग्न समारंभात एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. लग्नाच्या अवघ्या चार दिवसा नंतर नवरदेवाचा मृत्यू झाला आहे.सर्व कुटुंब आनंदात होत.
सदर घटना बिहारच्या मुंगेरी जिल्ह्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुसा गली येथे आशिष कुमारचे लग्न 13 फेब्रुवारी रोजी करिष्माशी झाले. एकुलत्या एक मुलाचे लग्न आशिषच्या वडिलांनी मोठ्या थाटामाटात केले. 13 ला लग्न करून 14 फेब्रुवारी रोजी वरात मुंगेरला नवरीला घेऊन परतली.
लग्नाचं रिसेप्शन 16 फेब्रुवारी रोजी आयोजित केले होते. 17 फेब्रुवारीला नववधू करिष्मा परत मांडवाणीसाठी माहेरी गेली. आशिष घराची कामे करत होता. पाहुण्यांची सेवा करत होता. नंतर तो त्याच्या खोलीत झोपायला गेला असता रात्री त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्याने वडिलांना फोन केला. आशिष पलंगावरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली. त्याचे वडिलांनी इतर कुटुंबीय खोलीत पोहोचले तो पर्यंत आशिषचा मृत्यू झाला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आशिषच्या निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Edited by – Priya Dixit