गर्भवती महिलेला देण्यात आलेल्या फूड पॅकेटमध्ये आढळला मृत साप
एका गर्भवती महिलेला देण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटात मृत साप आढळून आला आहे. सांगली (sangli) जिल्ह्यातील पलूस-कडेगाव (palus – kadegao)येथे ही घटना घडली. पलूस-कडेगावचे विधानसभा सदस्य (आमदार) विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला आहे.दिलेल्या वृत्तानुसार, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बाळांसाठी सरकारच्या पोषण योजनेंतर्गत महिलेला अन्नाचे पॅकेट देण्यात आले होते.हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील स्थानिकांनी ही बाब स्थानिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी (raja dayanidhi) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे तसेच खाद्यपदार्थांच्या पाकिटांच्या वितरणाबाबत सरकारी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्याचे आदेश दिले आहेत.”गरोदर महिलेला दिलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटात मृत साप (snake) आढळून आला. हा एक गंभीर प्रकार आहे. अशा गुन्ह्यांमागे जे गरोदर महिला आणि बाळांच्या जिवाशी खेळत आहेत, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे,” असे विश्वजीत कदम (vishwajit kadam) यांनी विधानसभेत सांगितले.हेही वाचामहाराष्ट्रात झिका व्हायरस: 8 रुग्ण नोंदवल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारीपुण्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी
Home महत्वाची बातमी गर्भवती महिलेला देण्यात आलेल्या फूड पॅकेटमध्ये आढळला मृत साप
गर्भवती महिलेला देण्यात आलेल्या फूड पॅकेटमध्ये आढळला मृत साप
एका गर्भवती महिलेला देण्यात आलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटात मृत साप आढळून आला आहे. सांगली (sangli) जिल्ह्यातील पलूस-कडेगाव (palus – kadegao)येथे ही घटना घडली. पलूस-कडेगावचे विधानसभा सदस्य (आमदार) विश्वजीत कदम यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला आहे.
दिलेल्या वृत्तानुसार, गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बाळांसाठी सरकारच्या पोषण योजनेंतर्गत महिलेला अन्नाचे पॅकेट देण्यात आले होते.
हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावातील स्थानिकांनी ही बाब स्थानिक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी (raja dayanidhi) यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे तसेच खाद्यपदार्थांच्या पाकिटांच्या वितरणाबाबत सरकारी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्याचे आदेश दिले आहेत.
“गरोदर महिलेला दिलेल्या खाद्यपदार्थाच्या पाकिटात मृत साप (snake) आढळून आला. हा एक गंभीर प्रकार आहे. अशा गुन्ह्यांमागे जे गरोदर महिला आणि बाळांच्या जिवाशी खेळत आहेत, हे सरकारने समजून घेतले पाहिजे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे,” असे विश्वजीत कदम (vishwajit kadam) यांनी विधानसभेत सांगितले.हेही वाचा
महाराष्ट्रात झिका व्हायरस: 8 रुग्ण नोंदवल्यानंतर केंद्राकडून नियमावली जारी
पुण्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांना प्रवेश बंदी