नांदेड जिल्ह्यात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलांचे मृतदेह आढळले

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे रेल्वे रुळावर प्रेमी युगुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोंघांचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या अद्याप हे समजू शकले नाही. साईनाथ अशोक चंदापुरे(24) आणि सविता होळगावे(19) अशी मयतांची नावे आहे. मयत तरुण आणि …

नांदेड जिल्ह्यात रेल्वे रुळावर प्रेमी युगुलांचे मृतदेह आढळले

नांदेड जिल्ह्यात धर्माबाद येथे रेल्वे रुळावर प्रेमी युगुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोंघांचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या अद्याप हे समजू शकले नाही. साईनाथ अशोक चंदापुरे(24) आणि सविता होळगावे(19) अशी मयतांची नावे आहे. मयत तरुण आणि तरुणी हे उमरी तालुक्यातील नागठाणा बुद्रुक येथील रहिवासी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सविता आणि साईनाथ या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र 3 महिन्यापूर्वी सविताचे लग्न झाले असून ती विवाहित होती. आणि आपल्या माहेरी नागठाणा बुद्रुकला आली होती. 

गुरुवारी ती 11 वाजेपर्यंत आई सोबत नंतर ती अचानक गायब झाली. ती बाहेर कधी निघून गेली. तिचा शोध घेतल्यावर तिचा आणि गावातील तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. 

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळतातच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. रेल्वे खाली येऊन आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

 

Edited by – Priya Dixit    

 

Go to Source