समतावादी चळवळीतील कार्यकर्ते दयानंद कनकदंडे यांची आत्महत्या

सामाजिक समतावादी चळवळीतील कार्यकर्त्ये व मैत्री प्रकाशनचे प्रकाशक दयानंद कनकदंडे यांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुण्यातील दिघी येथे घडली आहे.

समतावादी चळवळीतील कार्यकर्ते दयानंद कनकदंडे यांची आत्महत्या

सामाजिक समतावादी चळवळीतील कार्यकर्ते  व मैत्री प्रकाशनचे प्रकाशक दयानंद कनकदंडे यांनी राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पुण्यातील दिघी येथे घडली आहे. 

ते दिघीतील एका सोसायटीत राहत होते. मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी राहत्या घराच्या  तिसऱ्या मजलीच्या बाल्कनीतून उडी मारून आपले आयुष्य संपविले. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मागे पत्नी, आई,वडील असा परिवार आहे. 

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दिघीचे वरिष्ठ निरीक्षक म्हणाले , घटनास्थळी केलेल्या पाहणी नंतर हे आत्महत्यांचे प्रकरण केल्याचे दिसत आहे. पुढील तपास सुरु आहे. 

त्यांच्या जाण्याने चळवळीची मोठी हानी असल्याचे म्हटले जात आहे. काहींनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून सोशल मीडियावर तर्कवितर्क लावले जात आहे. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही.पोलीस पुढील तपास करत आहे. 

 

Edited by – Priya Dixit  

 

Go to Source