भारताविरुद्धची डेव्हिस लढत पाक टेनिससाठी ऐतिहासिक क्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक सामना हा पाकिस्तानमधील टेनिससाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामागचा उद्देश गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुपस्थितीमुळे कोपऱ्यात फेकल्या गेलेल्या आणि महत्त्व गमावलेल्या खेळात नवा उत्साह भरणे आणि त्याला पुनरुज्जीवित करणे हा आहे.
भारतीय डेव्हिस चषक संघाने पाकिस्तानला 1964 मध्ये शेवटच्या खेपेला भेट दिली होती. यामुळे ही लढत खरोखरच एक ऐतिहासिक घटना बनली आहे. पाकिस्तानमध्ये लढत ठेवण्याच्या निर्णयाला आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने पाठिंबा दिलेला आहे. महासंघाने आश्वासन दिले आहे की, भारतीय खेळाडूंना कोणत्याही सुरक्षाविषयक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. 2009 साली लाहोरमध्ये श्रीलंकी क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा ठप्प झाल्या. या देशाला त्यानंतर सर्व खेळांतील जागतिक स्तरावरील क्रीडास्पर्धा आयोजित करण्यापासून मज्जाव करण्यात आला.
पाकिस्तान टेनिस महासंघ कनिष्ठ खेळाडूंची आयटीएफ स्पर्धा, वरिष्ठ पुऊषांची स्पर्धा किंवा महिलांच्या स्पर्धांचे आयोजन करू शकत नसल्यामुळे टेनिसच्या वाढीवर यामुळे परिणाम झाला. यामुळे उगवत्या खेळाडूंच्या विकासातही अडथळा निर्माण झाला. 2017 मध्ये इराण आणि 2021 मध्ये जपानसारख्या आंतरराष्ट्रीय संघांचे झालेले आगमन ही सकारात्मक घडामोड राहिलेली असली, तरी भारत आणि पाकिस्तान जेव्हा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात तेव्हा उत्साह नवीन उंचीवर पोहोचत असतो.
पाकिस्तानचे अव्वल खेळाडू, इसाम-उल-हक कुरेशी आणि अकील खान यांनी या डेव्हिस चषक लढतीमुळे दोन्ही देशांदरम्यान अधिक क्रीडास्पर्धांचे दरवाजे उघडतील, अशी आशा व्यक्त केली आहे. ‘एटीपी टूर’मध्ये भाग घेणारा एकमेव पाकिस्तानी खेळाडू असलेला इसम-उल-हक कुरेशी याने म्हटले आहे की, माझ्यासाठी बहुदा ही सर्वांत ऐतिहासिक लढत आहे. मी त्याचा भाग होण्यासाठी खूप उत्साहित आहे. मला वाटते की, हे निश्चितच पाकिस्तानमधील टेनिसला प्रोत्साहन देणार आहे. अकील खान हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय टेनिस केंद्राचा मुख्य प्रशिक्षक आणि राष्ट्रीय विकास संचालक आहे. ‘2018 मध्ये आमच्याकडे 2000 पेक्षा कमी कनिष्ठ खेळाडूंनी नोंदणी केली होती. आंतरराष्ट्रीय टेनिस पुन्हा सुरू झाल्यानंतर 2000 वरून ही संख्या 50,000 वर गेली आहे आणि त्यांना कायम ठेवणे हे आव्हान आहे’, असे त्याने म्हटले आहे.
Home महत्वाची बातमी भारताविरुद्धची डेव्हिस लढत पाक टेनिससाठी ऐतिहासिक क्षण
भारताविरुद्धची डेव्हिस लढत पाक टेनिससाठी ऐतिहासिक क्षण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डेव्हिस चषक सामना हा पाकिस्तानमधील टेनिससाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामागचा उद्देश गेल्या दशकात आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अनुपस्थितीमुळे कोपऱ्यात फेकल्या गेलेल्या आणि महत्त्व गमावलेल्या खेळात नवा उत्साह भरणे आणि त्याला पुनरुज्जीवित करणे हा आहे. भारतीय डेव्हिस चषक संघाने पाकिस्तानला 1964 मध्ये शेवटच्या खेपेला भेट दिली होती. […]