भक्तिमय वातावरणात तालुक्यात दत्त जयंती

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष : भाविकांची मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी वार्ताहर /किणये ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष करत मंगळवारी तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी दिवसभर भक्तांनी विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी […]

भक्तिमय वातावरणात तालुक्यात दत्त जयंती

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’चा जयघोष : भाविकांची मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी
वार्ताहर /किणये
‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ असा जयघोष करत मंगळवारी तालुक्मयाच्या विविध गावांमध्ये दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त मंगळवारी दिवसभर भक्तांनी विविध ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. काकड आरती, भजन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम झाले. काही ठिकाणी महाप्रसादाचे आयोजनही केले होते. ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान’ याप्रमाणे तालुक्मयात मंगळवारी श्री दत्तगुरुंचा जयघोष झाला. गुऊदेव दत्त मंदिरांमध्ये टाळ-मृदंगाच्या गजरात भजनाचे कार्यक्रम झाले. बहुतांशी ठिकाणी महिलांनी पाळणा गीत म्हणून दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा केला.
उद्यमबाग
येथील मजुकर कंपाऊंडमध्ये असलेल्या औदुंबराच्या झाडाजवळ भाविकांनी मंगळवारी दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला. सकाळी प्रकाश मजुकर व लक्ष्मी मजुकर आदींच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर चंद्रकांत बेळगावकर यांनी विधिवत पूजाअर्चा केली. मजुकर कंपाऊंडमधील औदुंबरच्या झाडाजवळ देवस्थान जागृत आहे, असे इथल्या भक्तांचे म्हणणे आहे. त्यामुळे दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सकाळी महाआरती करण्यात आली. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिल हुंदरे, वंदना भातकांडे, विकास भातकांडे, अन्वित मजुकर, प्रितेश मजुकर आदींसह भक्तमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. उद्यमबाग परिसरातील भक्तांनी व कामगार वर्गांने महाप्रसादाचा लाभ घेतला.
दत्तनगर, पिरनवाडी
येथील गुऊदेव दत्त मंदिरात मंगळवारी दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. सकाळी सागर केरूर भटजी यांच्या उपस्थितीत अभिषेक व पूजाविधी करण्यात आला. त्यानंतर भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी महिलांनी पाळणा गीत म्हटले. त्यानंतर श्रींचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
नवी गल्ली, आंबेवाडी
नवी गल्ली आंबेवाडी येथे दत्त जयंती सोहळा साजरा करण्यात आला. गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी रोज पहाटे काकड आरतीपासून रात्री उशिरापर्यंत विविध अध्यात्मिक कार्यक्रम झाले. मंगळवारी पहाटे काकड आरती करण्यात आली. सकाळी मूर्तीवर अभिषेक केला. सायंकाळी दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. सायंकाळी 7 नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
धामणे दत्त मंदिर
धामणे : येथील श्री दत्त मंदिरात मंगळवारी जय भवानी युवक मंडळातर्फे श्री दत्त जन्म जयंती उत्सव साजरा करण्यात आला. धामणे पाटील गल्ली येथील दत्त मंदिरातील दत्ताच्या मूर्तीला मंगळवारी सकाळी 6 ते 7 अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 ते 9.30 श्री दत्तमूर्तीचे विधिवत पूजन व मंदिरात सत्यनारायण पूजन करून आरती करण्यात आली. दुपारी 1 नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 5 वाजता श्री दत्त पाळणा उत्सव साजरा करण्यात आला व रात्री 7 नंतर भजनाच्या कार्यक्रमाने या उत्सवाची सांगता झाली.
शिवलीला पाटील यांचे उद्यमबाग येथे आज कीर्तन
राजारामनगर जीआयटी कॉलेज रोड उद्यमबाग येथील श्री गुऊदत्त दिगंबर सेवा संघ यांच्यावतीने मंदिरात मंगळवारपासून दत्त जयंती सोहळ्याला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी अभिषेक व पूजा करण्यात आली. सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. गुऊदत्त दिगंबर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. दत्त जयंती सोहळ्यानिमित्त बुधवार दि. 27 रोजी सायंकाळी 7 वाजता महिला कीर्तनकार ह. भ. प. शिवलीला पाटील (बार्शी, सोलापूर) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
उद्या महाप्रसादाचे आयोजन
गुऊवार दि. 28 रोजी सकाळी महाआरती, दुपारी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे गुऊदत्त दिगंबर सेवा संघाच्यावतीने कळविण्यात आले आहे.