शहरात दत्तजयंती उत्सवास प्रारंभ
दत्तनामाचा गजर, विविध कार्यक्रमांची रेलचेल : मंदिरांमध्ये आकर्षक सजावट
बेळगाव : शहरात दत्तजयंतीनिमित्त मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. मंगळवारी दत्तजयंती असल्याने दर्शनासाठी गर्दी होणार आहे. या निमित्ताने मंदिरांमध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील मारुती गल्ली दत्त मंदिर, आनंदनगर वडगाव, माधवपूर वडगाव, शांतीनगर टिळकवाडी, गोंधळी गल्ली, कलमेश्वर गल्ली अनगोळ, कपिलेश्वर मंदिर, अनगोळ दत्त मंदिर, कामत गल्ली दत्त मंदिर, दत्त गल्ली वडगाव, महात्मा फुले रोड शहापूर आदी मंदिरांतून दत्त जयंती उत्सवाला प्रारंभ झाला आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मंदिरांमध्ये भजन, प्रवचन आणि कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्याबरोबरच पूजन, अभिषेक, गुरुचरित्र पारायण, आरती, महाप्रसाद, पाळणा, मंत्रपुष्प, जागर आणि तीर्थप्रसाद होणार आहे. दत्त दर्शनासाठी मंगळवारी सर्वच मंदिरांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढणार आहे. विशेषत: जन्मसोहळा आणि आरतीसाठी दत्त मंदिर परिसर भाविकांनी फुलणार आहे. कलमेश्वर गल्ली, अनगोळ येथील दत्त मंदिरात मंगळवारी पहाटे काकड आरती, अभिषेक, भजन, कीर्तन होणार आहे. त्यानंतर दत्त जन्मोत्सवानिमित्त तीर्थप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. सायंकाळी स्वरगंधा म्युझिकल ग्रुपतर्फे भक्तीसंगीत कार्यक्रम होणार आहे. बुधवारी काकड आरती, पालखी सेवा मिरवणूक तर गुरुवारी काकड आरती, लघुरुद्राभिषेक, पूजा, महाआरती आणि महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
Home महत्वाची बातमी शहरात दत्तजयंती उत्सवास प्रारंभ
शहरात दत्तजयंती उत्सवास प्रारंभ
दत्तनामाचा गजर, विविध कार्यक्रमांची रेलचेल : मंदिरांमध्ये आकर्षक सजावट बेळगाव : शहरात दत्तजयंतीनिमित्त मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. मंगळवारी दत्तजयंती असल्याने दर्शनासाठी गर्दी होणार आहे. या निमित्ताने मंदिरांमध्ये आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शहरातील मारुती गल्ली दत्त मंदिर, आनंदनगर वडगाव, माधवपूर वडगाव, शांतीनगर टिळकवाडी, गोंधळी गल्ली, कलमेश्वर गल्ली अनगोळ, […]