दापोलीत आक्षेपार्ह पोस्टनंतर तणाव ! आरोपींनी माफी मागितल्यावर तणाव निवळला
दापोली प्रतिनिधी
आयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी दापोली शहरात मंगळवारी कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी या आरोपींना जनतेसमोर आणून माफी मागायला लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमाव शांत झाला. पोस्ट टाकणाऱ्यांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. यामुळे मंगळवारी दुपारनंतर दापोली शहरातील वातावरण कमालीचे तप्त झाले होते.
