दाणोली गावठण लिंग माऊलीचा आज जत्रोत्सव

दाणोलीसह केसरी, देवसू या तीन गावचे देवस्थान ओटवणे | प्रतिनिधी दाणोली गावठण येथील श्री लिंग माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी ३० डिसेंबर रोजी होत आहे. केसरी, दाणोली आणि देवसू या तीन गावचे हे देवस्थान असुन नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी लिंग माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.या दिवशी केसरी, दाणोली, देवसू या […]

दाणोली गावठण लिंग माऊलीचा आज जत्रोत्सव

दाणोलीसह केसरी, देवसू या तीन गावचे देवस्थान
ओटवणे | प्रतिनिधी
दाणोली गावठण येथील श्री लिंग माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवारी ३० डिसेंबर रोजी होत आहे. केसरी, दाणोली आणि देवसू या तीन गावचे हे देवस्थान असुन नवसाला पावणारी आणि माहेरवाशिणींची पाठीराखी अशी लिंग माऊलीची ख्याती असल्याने या जत्रोत्सवासाठी भाविकांची अलोट गर्दी होते.या दिवशी केसरी, दाणोली, देवसू या तीन गावच्या पालखीचे देवसू येथील शेंडोबा माऊली मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने या मंदिरात आगमन होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर देवीला भरजरी वस्त्र व सुवर्ण अलंकारांसह आकर्षक फुलांनी सजवील्यानंतर देवस्थानच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची मानाची ओटी भरण्यात येणार आहे त्यानंतर देवीच्या दर्शनास प्रारंभ होणार आहे.यानिमित्त रात्री सवाद्य पालखी मिरवणूकीनंतर आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केसरी, दाणोली आणि देवसू या तीन गावच्या देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थांनी केले आहे.