दही भल्ले रेसिपी

साहित्य- एक कप भिजलेली उडीद डाळ दोन कप गोड दही अर्धा टीस्पून हिंग एक चमचा आले चार हिरव्या मिरच्या एक कप कोथिंबीर अर्धा कप मनुका चार टेबलस्पून डाळिंबाचे दाणे दोन टीस्पून काश्मिरी लाल तिखट चार टीस्पून चाट मसाला

दही भल्ले रेसिपी

 

साहित्य-

एक कप भिजलेली उडीद डाळ

दोन कप गोड दही

अर्धा टीस्पून हिंग

एक चमचा आले

चार हिरव्या मिरच्या

एक कप कोथिंबीर  

अर्धा कप मनुका

चार टेबलस्पून डाळिंबाचे दाणे

दोन टीस्पून काश्मिरी लाल तिखट

चार टीस्पून चाट मसाला

चिंचेची चटणी

दोन टीस्पून जिरे भाजलेले 

चवीनुसार काळे मीठ

 तेल

ALSO READ: चिली गार्लिक नूडल्स रेसिपी

कृती-

दही भल्ले बनवण्यासाठी सर्वात आधी भिज़लेली उडीद डाळ पाण्यातून गाळून घ्या, व मिक्सरमध्ये घाला आणि पेस्ट करा. आता त्यात हिंग घाला आणि ते मलईदार होईपर्यंत फेटून घ्या. यानंतर या पेस्टमध्ये धणे, भाजलेले जिरे, हिरवी मिरची आणि आले घालावे. तसेच मनुके आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि तयार मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि ते तळून घ्यावे.  यानंतर हे तळलेले गोळे मिठाच्या पाण्यात भिजवा आणि काही वेळ बाजूला ठेवा. नंतर एक तासानंतर पाणी पिळून काढा. यानंतर, वर गोड दही, भाजलेले जिरे, चिंचेची चटणी, डाळिंबाचे दाणे आणि चाट मसाला घाला. तसेच गरम मसाला आणि कोथिंबीरची पाने घालून सजवा.

तर चला तयार आहे आपली दही भल्ले रेसिपी, नक्कीच सर्व्ह करा. 

अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Edited By- Dhanashri Naik