छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटविस्ताराच्या कामांत अडथळा ठरणारे ओएचई पोर्टल काढून टाकण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. शुक्रवार-शनिवार आणि शनिवार-रविवार मध्यरात्री 12.30 ते पहाटे 4.30 दरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत सीएसएमटी ते भायखळा अप-डाउन जलद आणि सीएसएमटी ते वडाळा रोडदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. त्याचबरोबर 9.54 सीएसएमटी ते कल्याण लोकल रद्द राहणार आहेत. 13 मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत चालवण्यात येणार असून दादर ते सीएसएमटी दरम्यान रद्द राहणार आहेत. फलाट विस्तारानंतर, सीएसएमटीहून अतिरिक्त मेल-एक्स्प्रेस चालवण्यासाठी लांब फलाट उपलब्ध होणार आहेत.शुक्रवार-शनिवारी दादर स्थानकात रद्द राहणाऱ्या रेल्वेगाड्या१२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी२२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस११०५८ अमृतसर-सीएसएमटी११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क१२८१० हावडा-सीएसएमटी मेलशनिवार-रविवारी दादर स्थानकात रद्द राहणाऱ्या रेल्वेगाड्या१२८७० हावडा-सीएसएमटी अतिजलद ०१०८० महू-सीएसएमटी विशेष १२०५२ मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी २२१२० मडगाव-सीएसएमटी तेजस ११०५८ अमृतसर-सीएसएमटी ११०२० भुवनेश्वर-मुंबई कोणार्क ०२१४० नागपूर-सीएसएमटी अतिजलद१२८१० हावडा-सीएसएमटी मेल
हेही वाचामुंबई विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम पूर्ण
बोरिवली ते कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूक सेवा उभारणार : पीयूष गोयल
सीएसएमटी : दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, ‘या’ एक्सप्रेस रद्द