सीआरपीएफ उपनिरीक्षक नक्षली हल्ल्यात हुतात्मा

एक हवालदार जखमी : चार संशयितांना अटक वृत्तसंस्था/ सुकमा छत्तीसगडमधील सुकमा येथे रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफमधील उपनिरीक्षक (एसआय) हुतात्मा झाले. तर अन्य एक हवालदार जखमी झाला. ही घटना जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. गेल्या चार दिवसांत जवानांवर झालेला हा चौथा नक्षलवादी हल्ला असल्याचे सांगण्यात आले. छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास […]

सीआरपीएफ उपनिरीक्षक नक्षली हल्ल्यात हुतात्मा

एक हवालदार जखमी : चार संशयितांना अटक
वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडमधील सुकमा येथे रविवारी सकाळी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफमधील उपनिरीक्षक (एसआय) हुतात्मा झाले. तर अन्य एक हवालदार जखमी झाला. ही घटना जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. गेल्या चार दिवसांत जवानांवर झालेला हा चौथा नक्षलवादी हल्ला असल्याचे सांगण्यात आले.
छत्तीसगडमधील सुकमा जिह्यात रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफ 165 व्या बटालियनचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले. तर हवालदार रामू जखमी झाला. जखमी जवानावर प्राथमिक उपचार करण्यात येत असून त्याला उपचारासाठी विमानाने अन्यत्र हलवण्यात आले आहे. या चकमकीनंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाकडून आजूबाजूच्या परिसरात कसून शोध घेण्यात येत आहे.
हुतात्मा उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी यांना मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी श्र्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी हुतात्म्याच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. या घटनेत जखमी झालेल्या जवान रामूवर योग्य उपचार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. रामूला उपचारासाठी हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

Go to Source