महिन्याच्या सुटीनंतर न्यायालयात गर्दी
वकिलासह पक्षकार हजर : न्यायालयीन कामकाजही सुरू
बेळगाव : गेल्या महिन्याभरापासून न्यायालयांना सुट्टी होती. त्यामुळे न्यायालयामध्ये शुकशुकाट पसरला होता. मात्र सोमवार दि. 27 मे पासून पुन्हा न्यायालये सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी न्यायालयांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. वकील तसेच पक्षकार हजर झाले होते. याचबरोबर न्यायालयीन कामकाजही पार पडले. न्यायालयाला उन्हाळी सुट्टी दिली जाते. एप्रिल अखेरपासून मे अखेरपर्यंत सुट्टी देण्यात येते. त्या काळात काही मोजकीच न्यायालये सुरू ठेवली जातात. त्या ठिकाणी महत्त्वाचे खटले चालविले जातात. सुट्टी असल्यामुळे न्यायाधीशांसह वकीलही सहली तसेच इतर कार्यक्रमांमध्ये गुंतलेले असतात. मात्र आता पुन्हा न्यायालये सुरू झाल्याने सोमवारी न्यायालये गजबजलेली दिसून आली. न्यायालयाचा पहिला दिवस असल्यामुळे वकिलांची मात्र न्यायालयात हजर होण्यासाठी मोठी धावपळ उडाली होती.
Home महत्वाची बातमी महिन्याच्या सुटीनंतर न्यायालयात गर्दी
महिन्याच्या सुटीनंतर न्यायालयात गर्दी
वकिलासह पक्षकार हजर : न्यायालयीन कामकाजही सुरू बेळगाव : गेल्या महिन्याभरापासून न्यायालयांना सुट्टी होती. त्यामुळे न्यायालयामध्ये शुकशुकाट पसरला होता. मात्र सोमवार दि. 27 मे पासून पुन्हा न्यायालये सुरू झाल्याने पहिल्याच दिवशी न्यायालयांमध्ये मोठी गर्दी दिसून आली. वकील तसेच पक्षकार हजर झाले होते. याचबरोबर न्यायालयीन कामकाजही पार पडले. न्यायालयाला उन्हाळी सुट्टी दिली जाते. एप्रिल अखेरपासून मे […]