करंबळ लक्ष्मीदेवीची ओटी भरण्यासाठी गर्दी
सकाळपासून गदगेच्या ठिकाणी भाविकांची रीघ
वार्ताहर /नंदगड
करंबळ येथील लक्ष्मी देवीच्या ओट्या भरण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून गदगेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या यात्रेत करंबळसह जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे पाच गावातील जनता एकवटली होती. यावेळी पंचांच्या, मानकऱ्यांच्या व पाचही गावातील ग्रामस्थांकडून ओट्या भरण्यात आल्या. त्यानंतर पै पाहुणे माहेरवासिनी यांनी ओट्या भरल्या. सायंकाळी उशिरापर्यंत ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरूच होता. रात्री एक वाजेपर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ होती. रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी व ओट्या भरण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. यावेळी यात्रोत्सव कमिटीतर्फे शांततेत व सुव्यवस्थेत देवीचे दर्शन घेण्यासाठी वारंवार विनंती करण्यात येत होती. पोलीस व स्वयंसेवकांनी आपली कामगिरी चोख बजावली. शुक्रवार असल्याने देवीचे दर्शन घेण्यासाठी खानापूर शहर व परिसरातील भाविक उपस्थित होते. यात्रेत आलेल्या पाळण्याचा आनंदही युवक व मुलांनी लुटला. त्यामुळे सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण दिसून येत होते.
Home महत्वाची बातमी करंबळ लक्ष्मीदेवीची ओटी भरण्यासाठी गर्दी
करंबळ लक्ष्मीदेवीची ओटी भरण्यासाठी गर्दी
सकाळपासून गदगेच्या ठिकाणी भाविकांची रीघ वार्ताहर /नंदगड करंबळ येथील लक्ष्मी देवीच्या ओट्या भरण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून गदगेच्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. या यात्रेत करंबळसह जळगे, रुमेवाडी, होनकल व कौंदल या पाच गावांचा समावेश आहे. त्यामुळे पाच गावातील जनता एकवटली होती. यावेळी पंचांच्या, मानकऱ्यांच्या व पाचही गावातील ग्रामस्थांकडून ओट्या भरण्यात आल्या. त्यानंतर पै पाहुणे माहेरवासिनी यांनी […]