Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात कोट्यवधींची भर ; दानपेटीतून २.११ कोटींची रक्कम जमा

                               १३ दिवसांत अंबाबाई मंदिरात २ कोटींपेक्षा अधिक दान कोल्हापूर -गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत अंबाबाई मंदिरातील बाराही दानपेट्यांमधील पैशांची मोजदाद करण्यात आली. यातून अंबाबाईच्या खजिन्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीत २ कोटी ११ लाख रुपये ३५ हजार ५२६ रुपये जमा […]

Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाईच्या खजिन्यात कोट्यवधींची भर ; दानपेटीतून २.११ कोटींची रक्कम जमा

                               १३ दिवसांत अंबाबाई मंदिरात २ कोटींपेक्षा अधिक दान
कोल्हापूर -गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत अंबाबाई मंदिरातील बाराही दानपेट्यांमधील पैशांची मोजदाद करण्यात आली. यातून अंबाबाईच्या खजिन्यात म्हणजे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीत २ कोटी ११ लाख रुपये ३५ हजार ५२६ रुपये जमा झाले आहेत. बँक ऑफ बडोदाचे पदाधिकारी व देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी मिळून सर्व बाराही दानपेट्यांमधील पैसे मोजण्याचे काम केले.
गेल्या १६ डिसेंबरपासून गेल्या ते १६ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या भाविकांनी दानपेट्यांमध्ये पैशाच्या स्वरुपात दान टाकले होते. त्याची मोजदाद गेल्या ४ फेब्रुवारीपासून सुरवात केली होती. मंदिरातील अभिषेक मंडपात पैसे मोजण्याचे काम सुरु राहिले.
मंगळवार १३ हजार दि. १७ रोजी पैसे मोजण्याचे काम पूर्ण झाले. मंदिरातील पेटी क्रमांक-२ मध्ये तब्बल ६४ लाख ३९ हजार ४७३ तर पेटी क्रमांक-१ मध्ये ५९ लाख ८१४ रुपये मिळून आले आहेत. तसेच पेटी क्रमांक-७ मध्ये ४७लाख १५ हजार ९७४ रुपये आणि पेटी क्रमांक-१२ मध्ये १९ लाख २४ हजार २२ रुपये मिळाले आहेत. अन्य ८ पेट्यांमधून ३ लाखांपासून ते साडे लाख रुपयांपर्यंतचे दान मिळाले आहेत, असे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे.