हलद्वानी हिंसाचार प्रकरणी गुन्हे सादर
वृत्तसंस्था / डेहराडून
उत्तराखंड येथील हलद्वानी येथे घडलेल्या धार्मिक दंगलीच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून 5,000 दंगलखोरांची ओळख आतापर्यंत पटविण्यात आली आहे. हलद्वानीच्या बाह्या भागांमधील संचारबंदी हटविण्यात आली असून आता या शहकारत तणावपूर्ण शांतता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सरकारी भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेला मदरसा आणि त्याला लागून असलेली मशीद सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार पाडविल्यानंतर येथे हिंसाचार घडविण्यात आला होता. या हिंसाचारात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती शनिवारी देण्यात आली. शुक्रवारी ही संख्या दोन अशी देण्यात आली होती. 250 हून अधिक लोक जखमीही झाले आहेत. हलद्वारी शहराच्या मुख्य भागांमध्ये अद्यापही संचारबंदी ठेवण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली. संपूर्ण उत्तराखंड राज्यात सध्या अतिदक्षतेचा आदेशही देण्यात आलेला आहे.
पूर्वनियोजित दंगल
मदरसा आणि मशीद पाडविल्यानंतर ही दंगल उसळली असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी ती भावनेच्या भरात झालेली नव्हती. या दंगलीमागे सुनियोजित कट होता, तसेच या दंगलीचे सूत्रधार राज्याबाहेचे असावेत, असेही अनुमान आहे. या सूत्रधारांना पकडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्य सरकारने पोलिसांचे दल निर्माण केले असून त्याच्यावर ही चौकशी सोपविली असल्याचे स्पष्ट करण्यात आले. चौकशी करण्यासाठी गेलेल्या पथकावरही जमावाकडून दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच तणावग्रस्त झालेली आहे.
Home महत्वाची बातमी हलद्वानी हिंसाचार प्रकरणी गुन्हे सादर
हलद्वानी हिंसाचार प्रकरणी गुन्हे सादर
वृत्तसंस्था / डेहराडून उत्तराखंड येथील हलद्वानी येथे घडलेल्या धार्मिक दंगलीच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली असून 5,000 दंगलखोरांची ओळख आतापर्यंत पटविण्यात आली आहे. हलद्वानीच्या बाह्या भागांमधील संचारबंदी हटविण्यात आली असून आता या शहकारत तणावपूर्ण शांतता आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. सरकारी भूमीवर बेकायदा बांधण्यात आलेला मदरसा […]