सरपंच, उपसरपंचासह 20 जणांविरुद्ध गुन्हा
शिवविरोधकांनी पोलिसांवर माती फेकून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप
मडगाव : सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास अडथळा आणल्याच्या आरोपावरुन मायणा-कुडतरी पोलिसांनी सां जुझे दी आरियल पंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मिळून सुमारे 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सासष्टी तालुक्याचे मामलेदार तथा दंडाधिकारी भिकू गावस यांनी याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सरपंच लिंडा फर्नांडिस, उपसरपंच वालेन फर्नांडिस, श्रीमती ज्योयसी डायस, आगुस्तीन पेरेरा, अॅलिस्टन फर्नांडिस, विन्सी मास्कारेन्हस, अँथनी फर्नांडिस, लिंडा फर्नांडिस, वालेंत फर्नांडिस, कार्मीना फर्नांडिस, फ्रेडी त्रावासो, मॉरीन रिबेलो, सेबिना मास्कारेन्हास, आल्बर्ट त्रावासो, बेर्था फर्नांडिस, पायटी फर्नांडिस, ज्यो डिकॉश्ता, साल्वादोर फर्नांडिस, एडिसन कार्दोझ, पिटर फालेरो व इतरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दगडमाती फेकल्याचा आरोप
या सर्व संशयित आरोपींनी समान हेतू डोळ्यांसमोर ठेऊन बेकायदेशीररित्या जमाव केला आणि मंत्री सुभाष फळदेसाई यांना सोबत घेऊन जात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडमिश्रीत माती फेकली, असा आरोप या संशयित आरोपींविरुद्ध ठेवण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुजल्यानंतर मंत्री सुभाष फळदेसाई यांना पोलिस त्यांच्या वाहनाकडे घेऊन जात असताना या जमावाने पोलिसांवर माती फेकली तसेच दगडमिश्रीत माती फेकल्याचा आरोप पोलिसांनी ठेवलेला आहे. या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी वरील संशयित आरोपांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 341, 332, 353, कलमाखाली गुन्हा (क्रमांक 15/2024) नोंद केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मायणा-कुडतरी पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रफुल्ला गिरी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, मंगळवारी पाद्रीभाट, सां जुझे दी आरियाल येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासभोवती बंदुकधारी पोलीस तैनात करण्यात आले होते.
Home महत्वाची बातमी सरपंच, उपसरपंचासह 20 जणांविरुद्ध गुन्हा
सरपंच, उपसरपंचासह 20 जणांविरुद्ध गुन्हा
शिवविरोधकांनी पोलिसांवर माती फेकून सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप मडगाव : सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास अडथळा आणल्याच्या आरोपावरुन मायणा-कुडतरी पोलिसांनी सां जुझे दी आरियल पंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच इतर मिळून सुमारे 20 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सासष्टी तालुक्याचे मामलेदार तथा दंडाधिकारी भिकू गावस यांनी याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. […]
