राकसकोपमध्ये क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

किणये : राकसकोप येथील श्रीराम स्पोर्टस् क्लब यांच्यावतीने प्रकाशझोतातील हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. या स्पर्धा रोज रात्री 8 वा. सुरु होत आसून  या स्पर्धेत आतापर्यंत 30 संघानी सहभाग घेतला आहे तर पाच षटकांची ही स्पर्धा खेळविली जात आहे. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील तर प्रास्ताविक लक्ष्मण गाडेकर यांनी केले. स्पर्धेचे […]

राकसकोपमध्ये क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

किणये : राकसकोप येथील श्रीराम स्पोर्टस् क्लब यांच्यावतीने प्रकाशझोतातील हाफपिच क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करुन स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. या स्पर्धा रोज रात्री 8 वा. सुरु होत आसून  या स्पर्धेत आतापर्यंत 30 संघानी सहभाग घेतला आहे तर पाच षटकांची ही स्पर्धा खेळविली जात आहे. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास पाटील तर प्रास्ताविक लक्ष्मण गाडेकर यांनी केले. स्पर्धेचे उद्घाटन युवराज जाधव याच्ंया हस्ते करण्यात आले.  शिवाजी कंग्राळकर, लक्ष्मण पाटील, रवि बाळेपुंद्री, भावकू मासेकर, धाकलू पाटील आदींच्या हस्ते देवदेवतांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत मारुती सुतार तर सूत्रसंचालन दिलीप पाटील यांनी केले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे 15 हजार, 10 हजार, 5 हजार अशी तीन बक्षिसे आहेत. तसेच मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यांना चषक देण्यात येणार आहे.